महत्वाच्या बातम्या

 यूपीआई ट्रांजैक्शन ची लिमिट वाढली : आता एकाच वेळी इतके पेमेंट करने होईल सोपे 


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / नवी दिल्ली : लोकांनी UPI Lite चा मोठ्या प्रमाणात वापर करावा यासाठी RBI ने काल (१० ऑगस्ट) एक मोठे पाऊल उचलले आहे. RBI ने UPI Lite मर्यादा २०० रुपयांवरून ५०० रुपये केली आहे.

म्हणजेच आता तुम्ही PIN न टाकता UPI Lite द्वारे एकावेळी ५०० रुपये पेमेंट करू शकता. चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीत, RBI गव्हर्नर शक्तीकांत दास म्हणाले की, डिजिटल पेमेंटचा अनुभव वाढवण्यासाठी UPI Lite ची मर्यादा वाढविण्यात आली आहे. जेणेकरून प्रत्येकजण त्याचा वापर करू शकेल.

UPI Lite म्हणजे काय?

UPI Lite ही UPI पेमेंटचे सिम्प्लिफाईड व्हर्जन आहे. हे २०२२ मध्ये नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) आणि RBI द्वारे सादर करण्यात आले होते. लहान व्यवहार जलद आणि सुलभ व्हावेत हा या अॅपमागचा मोठा उद्देश आहे. UPI Lite द्वारे, तुम्ही आजपासून तुमचा पिन न टाकता ५०० रूपयांचे पेमेंट एकाच वेळी करू शकता. इतकेच नाही, तर तुम्ही तुमच्या UPI Lite वॉलेटमध्ये एका दिवसात एकूण ४ हजार रुपये जोडू शकता.

UPI Lite वापरायचे कसे ?

UPI Lite वापरण्यासाठी, तुम्हाला कोणत्याही पेमेंट अॅपवर जायचं आहे. Phone pay, Google pay आणि Paytm यापैकी एखादे अॅप तुम्ही सुरु करा.

त्यानंतर तुम्हाला सेटिंग्जमध्ये जाऊन UPI Lite चा पर्याय शोधावा लागेल.

आता तुम्हाला तुमची बँक निवडून आणि तुमचे अकाऊंट Activate करायचे आहे.

तुमचे अकाऊंट अॅक्टिव्हेट झाल्यावर, पुढच्या वेळी पेमेंट करताना UPI Lite चा पर्याय निवडायचा आहे. आणि त्याद्वारे पैसे भरायचे आहेत.

यामध्ये एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा, सध्या फक्त काही बँका UPI Lite ची सेवा देतात. तुमचं बँक अकाऊंट त्या निवडक बँकांमध्ये असेल तरच तुम्ही या सुविधेचा लाभ घेऊ शकता.

पेमेंट मर्यादा वाढवण्याव्यतिरिक्त, RBI लवकरच UPI ची सुविधा आणि पोहोच वाढवण्यासाठी नवीन वैशिष्ट्ये जोडणार आहे. यातील एक वैशिष्ट्य म्हणजे UPI Lite द्वारे नियर-फील्ड कम्युनिकेशन (NFC) तंत्रज्ञानाचा वापर करून ऑफलाईन पेमेंट करणे. हे वैशिष्ट्य लोकांना मर्यादित किंवा इंटरनेट कनेक्टिव्हिटी नसलेल्या परिस्थितीतही डिजिटल पेमेंट करण्यास सक्षम करेल.





  Print






News - World




Related Photos