महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या भंडारा येथील लाचखोर विभागीय लेखाधिकाऱ्याला कारावास


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा :
भविष्य निर्वाह निधीमधून एक लाखांचे कर्ज मिळण्याकरीता सादर केलेला अर्ज वरीष्ठांना मंजूरीसाठी सादर करण्यासाठी ४०० रूपयांची लाच घेणारा राज्य परिवहन महामंडळाच्या भंडारा विभागीय कार्यालयातील विभागीय लेखाधिकाऱ्याला न्यायालयाने कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.
आरोपी मार्कड फंदिराम नंदेश्वर असे शिक्षा ठोठावण्यात आलेल्या लेखाधिकाऱ्याचे नाव आहे. 
तक्रारदाराने भविष्य निर्वाह निधी मधून १ लाख रूपये कर्ज मिळण्यांकरीता दिलेला अर्ज वरिष्ठांना मंजूरीसाठी सादर करण्याकरीता आरोपी   मार्कड फंदिराम नंदेश्वर याने तक्रारदारास  ४०० रूपये लाचेची मागणी करून लाच स्वीकारली. यामुळे त्याच्याविरूध्द भंडारा पोलीस ठाण्यात  कलम ७,१३ (१) (ड), १३ (२) ला.प्र. कायदा १९८८ अन्वये  ६ एप्रिल २०१३ रोजी गुन्हा नोंद करण्यात आला. सदर गुन्हयाचा तपास पुर्ण करून मान्यायालयात दोषारोप पत्र सादर करण्यात आले.  भंडारा येथील अतिरिक्त सत्र न्यायाधिश सचीन बी. भंन्साली यांनी आज ४ मे रोजी   आरोपी मार्कड फंदिराम नंदेश्वर याला कलम ७ लाप्रका मध्ये ३ वर्र्ष  कारावास व  २ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास २ महिने साध्या कारावासाची शिक्षा व  १३, (१) (ड), सह कलम १३(२) लाप्रका. अन्वये ३ वर्षे कारावास व १ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास १ महिने साधा कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

   Print


News - Bhandara | Posted : 2019-05-04


Related Photos