किन्हीराजा येथील अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर दरोडा , १५ लाखांची रोकड असलेली तिजोरीच पळवली


वृत्तसंस्था /  वाशिम :   जिल्ह्यातील किन्हीराजा येथील अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास दरोडा पडल्याने एकच खळबळ उडाली आहे.  चोरट्यांनी  बँकेतील १४ लाख ९१ हजार रुपयांची रोकड असलेली तिजोरीच  पळवली आहे.
वाशिममधील जऊळका पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या किन्हीराजा येथील शिव चौकातील बँकेत हा दरोडा पडला आहे. विशेष म्हणजे या बँकेत सुरक्षा रक्षक किंवा सीसीटीव्ही देखील नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. सध्या पीककर्ज वाटप सुरू असल्याने बँकेत मोछ्या प्रमाणात रोकड होती. घटनेची गाहिती मिळताच जऊळका  पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास करत आहेत.  Print


News - Rajy | Posted : 2019-05-04


Related Photos