महत्वाच्या बातम्या

 खामगाव शहर कचऱ्याचे साम्राज्य निर्माण होण्याच्या मार्गाने


विदर्भ न्यूज एक्सप्रेस

वृत्तसंस्था / बुलडाणा : खामगाव शहरात ठिकठिकाणी उघड्यावर कचरा टाकण्याचे प्रकार घडत आहेत. उघड्यावर कचरा टाकणाऱ्यां नगर परिषद च्या वतीने कोणत्याच स्वरूपाची कारवाई होत नसल्याने याचे प्रमाण वाढू लागले आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिका करीत आहे.

खामगाव नगर परिषद वतीने शहर स्वच्छ राहावे, यासाठी नगर परिषद काहीच प्रयत्न करतात दिसून येत नाही. नगर परिषद चा कचरा व्यवस्थापना बाबत गंभीर नसल्याचे दिसून येत नाही. खामगाव शहराच्या विविध भागांत काही नागरिक कचरा थेट रस्त्यावर किंवा रस्त्याच्या कडेला फेकून देत आहेत. यामुळे खामगाव शहर विद्रूप होऊ लागले आहे. तसेच, आजुबाजूच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना या भागातून ये-जा करताना या दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. शहरात रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या व शहर अस्वच्छ करणाऱ्यांना लगाम घालण्यासाठी क्लीन अप मार्शलची मोहीम हाती घेण्यात आली पाहिजे. या मोहिमेच्या माध्यमातून शहरात ज्या ठिकाणी कचरा रस्त्यावर कचरा टाकला जाईल, अशांवर कारवाई करण्यात आली पाहिजे त्या उलट रस्त्यावर कचरा फेकणाऱ्यांचे प्रमाण वाढू लागले आहे. खामगाव शहरातील मेन रोड, टिळक मैदान, फरशी, जलंब नाका परीसर, नांदुरा रोड, यांसह विविध भागांतील रस्त्याच्या कडेला कचरा टाकला जात आहे. त्यामध्ये प्लास्टिकच्या बाटल्या, खराब झालेल्या व न वापरात येणाऱ्या वस्तूंचा समावेश आहे. यावर कोणाचेही नियंत्रण नसल्याने सर्रास हा कचरा रस्त्याच्या कडेला टाकून निघून जात आहेत. कितेक दिवस हा कचरा त्याच ठिकाणी पडून राहत आहे. त्यामुळे हळूहळू या कचऱ्याचे ढिगारे तयार होऊ लागले आहेत. या कचरा कुजून आजूबाजूच्या परिसरात याची दुर्गंधी पसरत असते. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरात रोगराई पसरून नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे. यावर ज्या ज्या ठिकाणी कचरा रस्त्यावर कचरा टाकला जात आहे. त्या ठिकाणी नगर परिषद ने कचरा व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.





  Print






News - Rajy




Related Photos