सरकार व नक्षलवादी यांच्यात मध्यस्ती करण्यास तयार : अण्णा हजारे


वृत्तसंस्था / राळेगणसिद्धी : "नक्षलवादाचा प्रश्न बंदुकीच्या गोळीने नव्हे, तर चर्चा करूनच सुटू शकतो. या प्रश्नावर सरकार व नक्षलवादी यांच्यात मध्यस्ती करण्यास तयार आहे,'' असे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आज म्हणाले.
 ते म्हणाले, "प्रत्येकाचे प्रश्न असू शकतात; मात्र ते सोडवून घेण्याची पद्धत योग्य हवी. बॉंबस्फोट, गोळीबार, जाळपोळ, निरपराध लोकांचे जीव घेऊन प्रश्न सुटत नाहीत. हा प्रश्न बंदुकीच्या गोळीनेही सुटणार नाही. उलट तो अधिक अवघड बनत जाईल. संवादाने असे प्रश्न सुटू शकतात. संवादामुळे अनेकदा तलवारी म्यान झाल्याचा आपला इतिहास आहे. ही परंपरा आपण विसरता कामा नये. या प्रश्नाकडे मानवतावादी दृष्टीने पाहावे लागेल. दोन्ही बाजूंना मान्य असेल, तर आपण नक्षलवादाच्या प्रश्नात मध्यस्थी करण्यास तयार आहोत.''
 माझ्याकडे मोठी सत्ता नाही. आपण फकीर आहोत; मात्र राष्ट्र आणि समाजाचे हित हे आपले ध्येय आहे. त्यामुळेच आपण या प्रकरणात मध्यस्ती करण्यास तयार आहोत. सरकारनेही या प्रश्‍नाच्या मुळाशी गेले पाहिजे. नेमकी काय अडचण आहे, हे समजून घेतले पाहिजे. अशा घटनांचा राजकारणासाठी वापर करणे गैर आहे, असेही अण्णा हजारे म्हणाले.  Print


News - Rajy | Posted : 2019-05-04


Related Photos