महत्वाच्या बातम्या

 महिला रोजगार मेळाव्याचे आयोजन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व शासकीय औद्यागिक प्रशिक्षण संस्थेच्या संयुक्त विद्यमाने २५ ऑगस्ट रोजी पंडित दिनदयाल उपाध्याय महिला रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मेळाव्यास नोकरी इच्छुक महिला उमेदवारांनी उपस्थित राहून मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे सकाळी ११ वाजता आयोजित मेळाव्यात धूत ट्रान्समिशन कंपनी छत्रपती संभाजीनगर, पटले स्कील फांऊडेशन नागपूर, पीपल ट्री व्हेंचर्स छत्रपती संभाजीनगर, पीआयजीओ व्हेइकल बारामती, इडलवेज टोकियो लाईफ इंन्शुरन्स नागूपर, व्ही.टी.टेक्सटाईल्स जाम, लाईफ इंन्शुरन्स कंपनी हिंगणघाट आदी नांमाकित कंपनीकडे रिक्त असलेली पदे भरण्यासाठी कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित राहून पात्र उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेऊन निवड प्रक्रिया पार पाडणार आहे.

यासाठी इच्छुक उमेदवारांनी कमीत कमी इयत्ता ८ वी पास किंवा पुढील शैक्षणिक पात्रतेचे मुळ प्रमाणपत्र व एम्प्लॅायमेंट कार्ड घेऊन वेळेवर मेळाव्यात उपस्थित  राहावे, असे जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त निता औघड यांनी कळविले आहे.





  Print






News - Wardha




Related Photos