अंबुजा येथील तीन मुलांचा मंगी येथील नाल्यात बुडून मृत्यू , सुट्टी घालविण्यासाठी पोहायला जाणे जीवावर बेतले


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर (गडचांदूर ) :
सुट्टी घालविण्यासाठी नाल्यात  पोहायला जाणे   तीन मुलांच्या जीवावर बेतले आहे. नाल्यात बुडून तिघांचा मृत्यू झाल्याची घटना काल २ मे रोजी सकाळी घडली आहे. सार्थक शशीकांत अल्हाट (१२) रा. अंबुजा सिमेंट कॉलोनी उप्परवाही,  मंजित विजय सिंग (१४) रा. उप्परवाही मेन गेट वॉर्ड क्रमांक. ०३,  शुभम दिवाकर गाजेरे (१४) रा. रामटेक जिल्हा नागपूर अशी मृतकांची नावे आहेत. 
काल  सकाळी  ९.३०  वाजताच्या दरम्यान सार्थक ,मंजित,शुभम , अनुनय ही चार मुले नाल्याकडे फिरायला गेले असता अंबुजा सिमेंट लेबर कॉलोनी च्या मागे असलेल्या मंगी नाल्यात सार्थक , मंजित,शुभम हे तिघेजण अंघोळीला गेले.    सोबत असलेला चौथा युवक  अनुनय हा अंघोळीला गेला नाही. काही वेळाने अंघोळीला गेलेले त्याचे मित्र बाहेर न आल्यामुळे   अनुनय यांने अंबुज सिमेंट कॉलनी कडे धाव घेत  घडलेली  घटना सांगितली.
  घटनेची माहिती अंबुजा सिमेंट सुरक्षा अधिकारी विलास नारखेडे यांनी गडचांदूर पोलीस स्टेशनला माहिती सकाळी ११ वाजता  देत घटना स्थळाकडे धाव घेतली. पोलीस घटनास्थळी पोहोचत पर्यंत गावकऱ्यांनी मुलांची प्रेत बाहेर काढले होते. त्या नंतर युवकांना गडचांदूर ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.  या घटनेतील शुभम गाजेरे  हा २२ एप्रिल रोजी   सुट्या घालविण्याकरीत अंबुजा कॉलनी उप्परवाही येथे आला होता.     Print


News - Chandrapur | Posted : 2019-05-03


Related Photos