महत्वाच्या बातम्या

 आदिवासी समाजाने विकासासाठी एकसंघ राहावे : आ. डॉ. होळी यांचे प्रतिपादन


- गडचिरोली प्रकल्पाच्या पुढाकाराने आदिवासी दिन साजरा 

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : आदिवासी समाजापर्यंत मुलभूत सुविधा पोहोचल्या पाहिजे. जागतिक आदिवासी दिनाचे महत्त्व आदिवासींनी समजून घेतले पाहिजे. आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे. २५० शासकीय आश्रमशाळांना आदर्श आश्रमशाळा करण्याचा संकल्प महाराष्ट्र शासनाने केला आहे. आदिवासी विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घ्यावे. इकडे तिकडे न भटकता आदिवासी समाजाने आपल्या सर्वांगीण विकासासाठी एकसंघ राहावे असे प्रतिपादन गडचिरोली विधानसभा निर्वाचन क्षेत्राचे आमदार डॉ. देवराव होळी यांनी केले.

आदिवासी विकास विभाग अंतर्गत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोलीच्या वतीने जागतिक आदिवासी दिन कार्यक्रमाचे आयोजन येथील सुमानंद सभागृहात बुधवार ९ ऑगस्ट रोजी करण्यात आले. याप्रसंगी ते उद्घाटक म्हणून बोलत होते.

कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार डॉ. देवराव होळी तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते क्रांतिवीर बिरसा मुंडा व राणी दुर्गावती यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलित करून झाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी संजय मीणा होते.

याप्रसंगी अध्यक्ष स्थानावरून बोलताना जिल्हाधिकारी मीणा म्हणाले, गडचिरोली जिल्ह्याचा जलद गतीने विकास करायचा असेल तर शासन, प्रशासनाच्या सोबत सर्वांनी सहकार्याने करावे. शिक्षण, आरोग्य सेवा, नोकरी, रोजगारापासून आदिवासी व मागासलेला समाज वंचित राहणार नाही यासाठी संकल्प करावा. दूरदृष्टीकोन ठेवून विकास साधावा असे आवाहन केले.

प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह, अ.ज.प्र.त.समिती गडचिरोलीचे सह आयुक्त जितेंद्र चौधरी, प्रकल्प अधिकारी निलय राठोड, वरिष्ठ संशोधन अधिकारी चंदा मगर, आदिवासी सेवक प्रमोद पिपरे आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांसह शुभांगी सुरपाम या विद्यार्थिनीने मनोगत व्यक्त केले.

यावेळी प्रकल्पातील शासकीय व अनुदानित आश्रमशाळेतील तसेच नामांकित व सैनिकी शाळेतील इयत्ता १० व १२ वीच्या ३३ गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रम दरम्यान शासकीय इंग्रजी माध्यम आश्रम शाळा गडचिरोली, एकलव्य निवासी शाळा चामोर्शी तसेच शासकीय आदिवासी मुला मुलींचे वस्तीगृह गडचिरोली येथील विद्यार्थ्यांनी आदिवासी नृत्यातून आपले कलागुण सादर केले. कार्यक्रमाचे वृत्तलेखन माध्यमिक शिक्षक सुधीर शेंडे यांनी केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकल्प अधिकारी निलय राठोड यांनी केले. संचालन कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी संतोष कन्नाके यांनी केले व उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमास आदिवासी बांधव, विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहाय्यक प्रकल्प अधिकारी प्रफुल पोरेड्डीवार,अनिल सोमनकर,प्रभू सादमवार, सुधाकर गौरकर,कार्यालय अधीक्षक मिलिंद रामटेके, गजानन बादलमवार, लेखाधिकारी दादाजी सोनकर, मुकेश गेडाम, श्रीकांत वेले, वासुदेव उसेंडी, कार्तिकस्वामी कोवे, सुधीर जवळे, शालिनी वासे, लालू नरोटे, गुलाबचंद बांबोळे, प्रकाश अक्यमवार, राधिका जोशी, ओंकार राठोड, गणेश पराते, पूजा डंबारे, मंजू मडावी, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.





  Print






News - Gadchiroli




Related Photos