अहेरीत विद्युत तारांना स्पर्श झाल्याने टिप्पर जळाला


- नवीन रूग्णालयाचे बांधकाम साहित्य उतरवितानाची घटना
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / अहेरी :
येथे नव्यानेच निर्माण करण्यात येत असलेल्या रूग्णालयाच्या इमारतीकरीता बांधकाम साहित्य आणलेल्या टिप्परचा विद्युत तारांना स्पर्श झाल्याने टिप्परने पेट घेतल्याची घटना आज २ मे रोजी ५ वाजताच्या सुमारास घडली आहे.
टिप्परने साहित्य आणल्यानंतर खाली केले जात होते. दरम्यान चालकाला वर असलेल्या विद्युत तारांचा अंदाज आला नाही. टिप्परचा तारांना स्पर्श होताच आग लागली. यामुळे पेट घेतला आहे. वृत्त लिहिपर्यंत आग विझविण्याचे काम सुरू असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-05-02


Related Photos