महत्वाच्या बातम्या

 भारताची एकात्मता बलशाली करू


- मेरी माटी मेरा देश उपक्रमांतर्गत आज सर्व शासकीय कार्यालयात सामुहिक प्रतिज्ञा

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / भंडारा : केंद्र शासनाच्या निर्देशानुसार स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव अंतर्गत ९ ते १५ ऑगस्ट दरम्यान मेरी माटी मेरा देश हा उपक्रम संपूर्ण देशात राबविण्यात येणार आहे. भंडारा जिल्ह्यामध्ये शहरी भागात नगरपालिका, तर ग्रामीण भागात जिल्हा परिषद व जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. आज ९ ऑगस्ट रोजी या उपक्रमांतर्गत पंचप्रण शपथ हा कार्यक्रम जिल्हयातील सर्व शासकीय कार्यालयात होणार आहे.

शपथेचा मसुदा पुढीलप्रमाणे आहे. शपथेमध्ये भारतास २०४७ पर्यत आत्मनिर्भर आणि विकसित राष्र्प बनविण्याचे स्वप्न साकार करू, गुलामीची मानसिकता मुळापासून नष्ट करू. देशाच्या समृध्द वारशाचा गौरव करू, भारताची एकात्मता बलशाली करू आणि देशाचे संरक्षण करणाऱ्यांप्रति सन्मान बाळगू, देशाचेनागरिक म्हणून सर्व कर्तव्यांचे पालन करू. अशी सामुहिक शपथ आज सर्व शासकीय अधिकारी कर्मचारी अधिकारी घेतील. सोबतच सर्व निमशासकीय कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था,शाळा व महाविदयालये, शासकीय महामंडळे इत्यादी कार्यालयांमध्ये पंचप्रण शपथ घेण्यात येईल.

या उपक्रमाअंतर्गत अमृत सरोवर, जल स्त्रोताशेजारी शिलाफलक उभारणी, पंच प्रण शपथ व सेल्फी, वसुधा वंदन, वीरोंका नमन, ध्वजारोहण व राष्ट्रगाण असे कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. आपल्या मातीविषयी जनजागृती, प्रेम आणि साक्षरता निर्माण व्हावी, वीर योध्दांच्या समर्पणाचे स्मरण करणे याकरीता विशेष अभियान राबविणे अपेक्षित आहे. आज जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी याबाबत जिल्हास्तरीय यंत्रणांचा आढावा घेतला.





  Print






News - Bhandara




Related Photos