इंजिनीअरिंग, औषधनिर्माण शास्त्र, कृषी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेश परीक्षा (सीईटी) आजपासून


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / मुंबई :
  इंजिनीअरिंग, औषधनिर्माण शास्त्र, कृषी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेश परीक्षेला आज, २ मेपासून प्रारंभ होत आहे. या परीक्षेला राज्य पूर्व परीक्षा कक्षाकडून (सीईटी सेल) तब्बल चार लाख १३ हजार २८४ विद्यार्थ्यांच्या लॉग-इनमध्ये प्रवेशपत्र (हॉल तिकीट) उपलब्ध करून देण्यात आले आहे. 
आजपासून सुरू होणाऱ्या सीईटी परीक्षेला हॉल तिकिटासह मूळ ओळखपत्र, परीक्षेपूर्वी काही तास अगोदर परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे, परीक्षा केंद्रावर गैरवर्तन करू नये असे नियम विद्यार्थ्यांसाठी जाहीर केले आहेत. नियमांचे विद्यार्थ्यांनी काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन कक्षाकडून करण्यात आले आहे. ही परीक्षा प्रथमच ऑनलाइन होत असलेल्या परीक्षेवेळी विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी सीईटी सेलकडून विद्यार्थ्यांसाठी ऑफी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सराव परीक्षा घेण्यात आली. 

परीक्षेला जाण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी घ्यावयाची काळजी 

- लेझर प्रिंटरच्या साहाय्याने कागदावर हॉल तिकिटाची प्रिंट घ्या. हॉल तिकीट वैध असेल तरच उमेदवारांचे छायाचित्र आणि स्वाक्षरी प्रतिमा योग्यरित्या मुद्रित केली जातात. 

- आपल्या ऑनलाइन अर्जात नाव, जन्मतारीख, लिंग, उमेदवाराचा फोटो, स्वाक्षरी व उमेदवाराचा पत्ता याबाबत चुकीची माहिती भरली गेली असल्यास अंडरटेकिंगचा नमूना अर्ज भरून परीक्षा केंद्रावर घेऊन जावा. 

- परीक्षेच्या दिवशी प्राधिकरणाचा निर्णय अंतिम मानला जाईल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. 

- परीक्षा केंद्राच्या आत व गेटच्या आतमध्ये मित्र आणि पालकांना घेऊन जाऊ नका. 

- परीक्षा केंद्रावर नियोजित बसण्याची जागा बदलण्याची विनंती करू नका. 

- परीक्षेत प्रत्येक उमेदवाराला एकदाच कच्च्या कामासाठी कागद दिला जातो. त्यामुळे मिळालेला कागद वाया घालवू नये.   Print


News - Rajy | Posted : 2019-05-02


Related Photos