जंगलाचा अभ्यास करून नक्षल्यांना सडेतोड उत्तर देऊ : सुबोधकुमार जयस्वाल


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / मुंबई :
  गडचिरोलीच्या कुरखेडा तालुक्यात नक्षलवाद्यांनी काल रात्री महामार्गाच्या कामासाठी आणलेली ३६ वाहनं जाळली. तसेच आज  १ एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास सीआरपीएफच्या क्युआरटी जवानांना घेऊन जाणारे वाहन  भूसुरुंग स्फोटात उडविले . यामध्ये १५  जवान शहीद झाले. तसेच वाहनचालकांचा मृत्यू झाला.  यानंतर पोलीस आणि जवानांनी या भागात कोम्बिंग ऑपरेशन सुरू केलं आहे. यासंदर्भातील  माहिती देताना राज्याचे पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांनी जंगलाचा अभ्यास करून नक्षल्यांना सडेतोड उत्तर दिले जाईल असे म्हटले आहे. 
जयस्वाल म्हणाले, केद्रांतून सर्वप्रकारची मदत मिळत आहे.   आमची पथकं घटनास्थळी पोहोचतील आणि त्यानंतर माहिती घेऊन पुढची पावलं उचलली जातील.  या हल्ल्याचा थेट निवडणुकांशी संबंध लावता येणार नाही.  पोलीस संचालक म्हणून मी आणि आमची चमू प्रत्यक्ष घटनास्थळी जाणार आहोत असेही ते म्हणाले.  
आमच्याकडे निवडणूक काळात अशा घटना घडण्याची शक्यता असल्याची माहिती होती, मात्र तसे काही झाले नाही.  ही घटना दुर्दैवी  आहे, अशी घटना पुन्हा होऊ नये यासाठी आम्ही दक्ष राहू.  पूर्ण ताकदीनिशी आम्ही नक्षलवाद्यांचा बिमोड करू, असेही ते  म्हणाले.    Print


News - Rajy | Posted : 2019-05-01


Related Photos