जांभुळखेडा येथील नक्षल हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांची नावे


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : आज १ मे रोजी कुरखेडा तालुक्यातील जांभुळखेडा जवळील लेंढारी नाल्याजवळ नक्षल्यांनी स्फोटात पोलिसांचे वाहन उडवून दिले. या हल्ल्यात जलद प्रतिसाद दलाचे १५ जवान शहीद झाले. तसेच खासगी वाहनाचा चालकसुध्दा या घटनेत मृत्यूमुखी पडला आहे.
या हल्ल्यात
पोलिस शिपाई साहुदास बाजीराव मडावी रा. चिखली ता. कुरखेडा,
प्रमोद महादेवराव भोयर देसाईंगज,
राजु नारायण गायकवाड मेहकर जि. बुलढाणा,
किशोर यशवंत बोबाटे आरमोरी जि. गडचिरोली,
संतोष देविदास चव्हाण ब्राम्हणवाडा ता. औंध जि. हिंगोली,
सर्जेराव एकनाथ खरडे आळंद ता. देउळगाव राजा जि. बुलडाणा,
दयानंद ताम्रध्वज शहारे रा. दिघोरी मोठी ता. लाखांदूर जि. भंडारा ,
भुपेश पांडुरंग वालोदे लाखनी जि. भंडारा,
आरिफ तौशिब शेख रा. पाटोदा जि. बिड,
योगाजी सिताराम हलामी रा. मोहगाव ता. कुरखेडा ,
पुरणशहा प्रतापशहा दुगा भाकरोंडी ता. आरमोरी जि. गडचिरोली,
लक्ष्मण केशव कोडापे रा. येंगलखेडा ता. कुरखेडा ,
अमृत प्रभुदास भदाडे रा. चिंचघाट ता. कुही जि. नागपूर,
अग्रमान बक्षी रहाटे रा. तरोडा ता. आर्णी जि. यवतमाळ
नितीन तिलकचंद घोडमारे रा. कुंभाली ता. साकोली जि. भंडारा
या जवानांचा समावेश आहे.
वाहन चालक : दादुभाऊ सिंगनाथ रा. कुरखेडा
News - Gadchiroli | Posted : 2019-05-01