लेंढारी नाल्याजवळ भूसुरुंग स्फोट , १५ जवान शहीद


विदर्भ न्यूज एक्सप्रेस  
प्रतिनिधी / गडचिरोली :
नक्षल्यांनी   कुरखेड्यापासून अवघ्या ६ किलोमीटर अंतरावरील जांभूरखेडा जवळील लेंढारी नाल्याजवळ भूसुरुंगस्फोट घडविल्याने १५ जवान शहीद झाल्याची घटना घडली आहे.  या घटनेत  खासगी वाहनाचा चालकही ठार झाला आहे.  
 मध्यरात्री कुरखेडा तालुक्यातील दादापूर(रामगड) येथे नक्षल्यांनी राष्ट्रीय महामार्गाच्या कामावरील तब्बल ३६ वाहने, यंत्रसामग्री व कार्यालये जाळली. त्यानंतर आज सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास जलद प्रतिसाद पथकातील जवान टाटाएस या खासगी वाहनाने कुरखेडा येथून पुढे जात असताना कुरखेड्यापासून ६ किलोमीटर अंतरावरील जांभूरखेडा गावाच्या अलिकडे असलेल्या छोट्या पुलावर नक्षल्यांनी भूसुरुंगस्फोट घडविला. त्यात १५ जवान शहीद झाले असून, खासगी वाहनाचा चालकही ठार झाला आहे.वाहनाच्या चिंधड्या उडाल्या आहेत. घटनास्थळावर अजूनही पोलिसांची नक्षल्यांशी चकमक सुरु आहे.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-05-01


Related Photos