महत्वाच्या बातम्या

 वर्धा ते पुणे दरम्यान रेल्वे प्रवासी क्षमता रेल्वे मंत्रालयाने तातडीने वाढवावी : खा. रामदास तडस यांची लोकसभेत मागणी


- खा. रामदास तडस यांनी लोकसभेत नियम ३७७ अंतर्गत उपस्थित केला प्रश्न

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नवी दिल्ली (वर्धा) : वर्धा येथून पुणे येथे प्रवास करणाऱ्यांची संख्या लक्षात घेता. नागपूर येथून पुणे येथे जाणाऱ्या वर्धा ते पुणे दरम्यान रेल्वे प्रवासी क्षमता रेल्वे मंत्रालयाने तातडीने वाढवावी याकरिता वर्धा लोकसभा मतदार संघाचे खा. रामदास तडस यांनी आज लोकसभेत नियम ३७७ अंतर्गत प्रश्न उपस्थित करुन लोकसभेचे लक्ष वेधले.

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात समृद्धी महामार्गावर झालेल्या एका खाजगी बसच्या अपघातात २५ प्रवाश्यांचा मृत्यू झाला होता, त्यात १४ प्रवासी वर्धा जिल्ह्यातील होते, त्यापैकी बहुतांश युवक हे नोकरी आणि अभ्यासासाठी पुण्यात जाण्याकरिता प्रवास करीत होते, या घटनेची दखल घेऊन माननीय पंतप्रधानांनीही केंद्र सरकारच्या माध्यमातून सर्व पीडित कुटुंबांना २ लाख रुपयांची आर्थिक मदत केलेली आहे. विदर्भातील नोकरीवर व शिकण्यासाठी पुणे येथे जाणा-यांची संख्या जास्त असुन रेल्वे प्रवासावर विश्वास असल्याने रेल्वे प्रवास करतात असे नमुद करुन खालील नमुद केल्याप्रमाणे तात्काळ अमलबजावनी करता येण्यासारख्या उपाययोजना सभागृहाच्या माध्यमातुन रेल्वे मंत्र्यांना खा. रामदास तडस यांनी सुचविल्या यासाठी यामध्ये प्रामुख्याने १. वर्धा ते पुणे दरम्यान दररोज नवीन रेल्वे सेवा सुरू करावी. ११०४०/११०३९ महाराष्ट्र एक्सप्रेस, २. १२११४/१२११३ गरीब्रथ एक्सप्रेस, २२१२४/२२१२३ अजनी-पुणे सुपरफास्ट एक्स्प्रेस,  २२१४०/२२१३९ अजनी-पुणे हमसफर एक्सप्रेस, १२८५०/१२८४९ या या रेल्वे गाडयांची क्षमता २४ डब्ब्यापंर्यत वाढवावी. तसेच. ३. हावडाहून पुण्याकडे जाणा़-या १२२२२/१२२२३ दुरांतो एक्स्प्रेसला वर्धा आणि बडनेरा येथे थांबा देण्यात यावा. ४. २०८२२/२०८२१ संत्रागाछी-पुणे हमसफर एक्स्प्रेस या गाडीला नागपूरनंतर भुसावळलाच थांबा आहे. या गाडीला वर्धा व बडनेरा येथे थांबा द्यावा. ५. नागपूर ते हैद्राबाद वंदेभारत ट्रेन सुरु करावी. याचा फायदा रेल्वे विभाग व प्रवासी वर्गालात होईल त्यामुळे प्रवाश्याच्या हितासाठी वर्धा ते पुणे दरम्यान रेल्वे प्रवासी क्षमता रेल्वे मंत्रालयाने तातडीने वाढवावी अशी विनंती लोकसभेच्या माध्यमातुन मा. रेल्वेमंत्री यांना खासदार रामदास तडस यांनी केली.

नविन रेल्वे सुरु करण्याची मागणी वगळता इतर सर्व उपाययोजना तातडीने अमल करण्यासारख्या आहे. या विषयावर कार्यवाही करण्याकरिता लवकरच रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष यांना भेटून प्रवासी वर्गाला दिलासा देण्याकरिता प्रयत्न करणार असल्याचे यावेळी खा. रामदास तडस यावेळी स्पष्ट केले.





  Print






News - World




Related Photos