नक्षल्यांनी महामार्गाच्या कामावरील २७ ते ३० वाहने, मिक्सर प्लाॅंट जाळला


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
नक्षल्यांनी कुरखेडा दादापूर जवळ महामार्गाच्या कामावरील तब्बल २७ ते ३० वाहनांसह मिक्सर प्लाॅंटला आग लावून दिल्याची घटना ३० एप्रिल रोजीच्या मध्यरात्री १२  वाजताच्या सुमारास घडली आहे. या घटनेत कोट्यवधींची वाहने तसेच इतर साहित्य जळून खाक झाले आहेत.
रात्री १२ वाजताच्या सुमारास शेकडोंच्या संख्येने नक्षली प्लाॅंटच्या आवारात शिरले. त्यांनी तिथे उभ्या असलेल्या वाहनांना आग लावून दिली. या ठिकाणी नक्षल्यांनी बॅनरसुध्दा बांधले आहेत. यामधून त्यांनी कंत्राटदारांना तंबी दिली आहे. विकासाच्या नावावर रस्ते, पुल तयार करणे बंद करावे, असे आवाहन नक्षल्यांनी केले आहे. जाळपोळ करण्यात आलेल्या वाहनांमध्ये जेसीबी, टक तसेच इतर जडवाहनांचा समावेश आहे.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-05-01


Related Photos