जन्मदात्या आईचा खून करणाऱ्या आरोपीस आजन्म कारावास


- ५०० रूपयांचा दंड
- गडचिरोली येथील न्यायालयाचा निकाल
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
खर्चाकरीता पैसे देण्यास नकार दिल्याने जन्मदात्या आईचा खून करणाऱ्या आरोपीस गडचिरोलली येथील जिल्हा व सत्र न्यायाधिश - १ राजेंद्र एन. मेहरे यांनी आजन्म कारावास व ५०० रूपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
सुनिल नारायण दानोरकर (३०) रा. आलापल्ली असे आरोपीचे नाव आहे. १ एप्रिल २०१५ रोजी आरोनी सुनिल याने आपली आई वच्छला नारायण दानोरकर हिच्याकडे स्वतःच्या खर्चासाठी पैसे मागितले. आईने पैसे देण्यास नकार दिल्याने आरोपीने तिला घराबाहेर काढून रस्त्यावर तिचा पाठलाग करून तिच्या डोक्यावर मागून लाकडी दांड्याने वार केले. यामुळे ती जागीच गतप्राण झाली. यानंतर त्याने स्वतः पाण्याच्या टाकीवर चढून उडी मारली. त्याला नागरीकांनी तसेच पोलिसांनी पकडून ताब्यात घेतले. आरोपीची नातेवाईक रंजीता वागरे हिने अहेरी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली.
आरोपीविरूध्द कलम ३०२ भादंविनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पूर्ण करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले. सरकार तर्फे प्रत्यक्षदर्शी व इतर साक्षीदारांचे बयाण तसेच वैद्यकीय अहवाल व सरकारी पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य धरून आरोपीस आज ३० एप्रिल रोजी शिक्षा ठोठावण्यात आली. सरकारी पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील अनिल एम. प्रधान यांनी काम पाहिले. गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक फिरोज मुलानी यांनी केला. पैरवी अधिकारी म्हणून सहाय्यक पोलिस निरीक्षक शरद मेश्राम यांनी काम बघितले.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-04-30


Related Photos