दहशतवाद्यांच्या कॅम्पवर नजर ठेवण्यासाठी इस्रो ची तयारी, ५ सॅटेलाईट सोडणार


वृत्तसंस्था / नवी दिल्ली :  पाकिस्तान च्या कुरापती आणि  दहशतवाद्यांच्या कॅम्पवर नजर ठेवण्यासाठी इस्रो तयारी करत  असून  पुढील १० महिन्यांमध्ये ८ कृत्रिम उपग्रह अवकाशात सोडले जाणार आहेत. यातील ५ कृत्रिम उपग्रह हे देशाच्या सीमांच्या संरक्षणासाठी वापारण्यात येतील असे सांगण्यात येत आहे.
या ५ उपग्रहांपैकी एक कार्टोसॅट सिरिज आणि ४ रीसॅटचे उपग्रह आहेत. तर अन्य तीन उपग्रह हे जीसॅट सिरिजमधील आहेत. जीसॅट उपग्रहांचा उपयोग कम्युनिकेशन म्हणजेच संचार क्षेत्रात केला जातो. तसेच सैन्य दलांच्या संभाषण आणि संपर्कासाठी सुरक्षित प्रणालीची आवश्यकता असते. त्यामुळे या उपग्रहाचा वापर सैन्य दलांसाठी करता येऊ शकतो. फेब्रुवारी २०२० पर्यंत हे उपग्रह लाँच करण्यात येण्याची शक्यता आहे.
पाकिस्तानविरोधात करण्यात आलेल्या सर्जिकल आणि एअर स्ट्राईक वर रीसॅट आणि कार्टोसॅट उपग्रहांची मदत घेण्यात आली होती. रीसॅटच्या मदतीने अंतराळातून थेट जमिनीपासून तीन फूट उंची पर्यंतचे चांगले फोटो काढता येतात. तर कार्टोसॅट इतके प्रगत तंत्रज्ञान आहे की त्यामधून जमिनीवरील अवघ्या एक फुटावरील फोटो घेता येतात. म्हणजे तुमच्या हातावरील घड्याळ्यात किती वाजले एवढे स्पष्ट वाचता येते. याचाच एक भाग म्हणून गेल्या सहा महिन्यांत असे तीन उपग्रह सोडण्यात आले आहेत. नोव्हेंबरमध्ये हायसिस, जानेवारीमध्ये माईक्रोसॅट - आर आणि एप्रिलमध्ये एमीसॅट असे कृत्रिम उपग्रह लाँच करण्यात आले होते.

हे उपग्रह लॉन्च होणार

रीसॅट-2 बीः मे 2019

कार्टोसॅट-3: जून 2019

रीसॅट-2बीआर1: जुलै 2019

जीसॅट-1(न्यू): सप्टेंबर 2019

रीसॅट-2बीआर 2: ऑक्टोबर 2019

जीसॅट-2: नोव्हेंबर 2019

रीसॅट-1एः नोव्हेंबर 2019

जीसॅट-32: फेब्रुवारी 2020  Print


News - World | Posted : 2019-04-30


Related Photos