'चौकीदार चोर है' प्रकरणी राहुल गांधी यांना पुन्हा माफी मागण्यासाठी सोमवारपर्यंत वेळ


वृत्तसंस्था /  नवी दिल्ली :   चौकीदार चोर है हे आता सर्वोच्च न्यायालयालाही मान्य आहे असं विधान का केलं ? असा प्रश्न विचारणाऱ्या सर्वोच्च न्यायालयासमोर राहुल गांधी यांच्याविरोधात न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी याचिका दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी राहुल गांधी यांना पुन्हा माफी मागावी लागणार आहे. सुनावणीदरम्यान राहुल गांधी यांना पुन्हा माफी मागण्यासाठी सोमवारपर्यंत वेळ दिला आहे.
न्यायालयाने जे वाक्य उच्चारलेलेच नाही ते वाक्य न्यायालयाच्या तोंडी घालून त्याचा राजकीय फायदा उचलण्याचा प्रयत्न राहुल गांधी करत असल्याबद्दल भाजप नेत्या मीनाक्षी लेखी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. 
राहुल गांधी यांचे वकील अभिषेख मनु सिंघवी यांनी सुनावणीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले की आम्ही ३ गोष्टींसाठी न्यायालयाची माफी मागितली आहे. राहुल गांधी यांचा माफीनामा सोमवारी दाखल केला जाईल. असं असलं तरी यापुढेही ‘चौकीदार चोर है’ ही काँग्रेसची मोहीम सुरू राहणार असल्याचं सिंघवी यांनी सांगितले. चौकीदार चोर है हे आता सर्वोच्च न्यायालयालाही मान्य आहे असं विधान केले याबद्दल माफी मागत आहोत मात्र त्याचा राजकीय मोहिमेवर परिणाम होणार नाही असेही सिंघवी म्हणाले
राहुल गांधी यांनी आजपर्यंत २ माफीनामे दाखल केले होते. या दोन्ही माफीनाम्यांबद्दल नाराजी व्यक्त करत सर्वोच्च न्यायालयाने तुम्हाला माफी मागण्यासाठी २२ पानांची गरज काय असा प्रश्न विचारला आहे. या प्रतिज्ञापत्रातील भाषेवरही न्यायालयाने आक्षेप घेतला आहे. कंसामध्ये म्हणजेच ब्रॅकेटमध्ये खेद वाटतो हे लिहण्याचे कारण काय आहे असा सवाल न्यायालयाने विचारला आहे. सर्वोच्च न्यायालयाने चौकीदार चोर है असं कधीही म्हटलेले नाही मग ‘चौकीदार चोर हैं’ हे आता सर्वोच्च न्यायालयालाही मान्य आहे असं विधान का केलं जातं असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधी यांचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांना केला.   भाजप नेत्या मीनाक्षी लेखी यांचे वकील मुकुल रोहतगी यांनी याबाबत युक्तिवाद करताना म्हटले की राहुल गांधी यांनी खोडसाळपणे न्यायालयाच्या तोंडात वाक्य घातली होती. याबद्दल त्यांनी नुसता खेद व्यक्त केला आहे. न्यायालयाचा अवमान केल्याबद्दल त्यांनी बिनशर्त माफी मागितली पाहिजे.   Print


News - World | Posted : 2019-04-30


Related Photos