अज्ञान ट्रकची क्रुझर ला धडक, नववधूसह तिघे ठार, सात जखमी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
सचिन मेश्राम  / मारेगाव : ​
मारेगावजवळ ट्रक आणि क्रुझर गाडीचा भीषण अपघात झाला.  मंगळवारी मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास ही घटना घडली असून या अपघातात नववधूसह तिघे जण ठार झाले आहेत. तर सात जण जखमी झाले आहेत. 
 लक्ष्मीबाई भारत उपरे ( ६०), सानिका किसन गोपाळे (२०)  , साक्षी देविदास उपरे (नववधु) (१८) अशी मृतकांची नावे आहेत.    जखमी मध्ये राजनंदिनी सुनिल पवार (४) , साधना कोंडबा गोंधरे (३५), पूजा शंकर उपरे (२०), चंपाबाई बाबा पेंडलेवार (७०)   या जखमींना नागपूर येथे पुढील उपचारा करिता रवाना करण्यात आले. 
चंद्रपूर येथील महांकाली देवीचे दर्शन घेऊन आपल्या गावी परत जात असताना मारेगाव पासून एक किमी अंतरावर अक्षरा रेस्टॉरंट जवळ हा अपघात झाला.
प्राप्त माहिती नुसार हिंगोली जिल्यातील बाळापूर येथील रहिवासी चंद्रपूर येथे लग्नानंतर महांकाली देवीच्या दर्शनासाठी गेले होते. दर्शन घेऊन परतीचा प्रवास करीत असताना मारेगाव येथील अक्षरा रेस्टारंट जवळ यवतमाळ कडून चंद्रपूर कडे जाणाऱ्या अज्ञात ट्रकने  कुझर (एम एच  ३४  के  २४३८) गाडीला जोरदार धडक दिली. यात क्रुझर गाडी रोड वरुन तीन पलटी खात रस्त्याच्या खाली गेली. हा अपघात इतका भीषण होता की यात दोन  महिलांचा  जागीच मृत्यू झाला तर एका महिलेचा उपचार दरम्यान मृत्यू झाला.  घटनेचा तपास मारेगाव पोलीस करित आहे.

 



  Print






News - Rajy | Posted : 2019-04-30






Related Photos