सिद्धेश्वर जवळ जड वाहनांची जबर धडक : दोन्ही वाहनाचा अक्षरशः चेंदा - मेंदा, २ गंभीर जखमी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / राजुरा :   
तालुका मुख्यालयापासून पासून १३ किलोमीटर अंतरावरील सिद्धेश्वर गावा जवळ आज मंगळवारी  सकाळी ६ वाजता, आसिफाबद महामार्गावर सामोरासमोरून येणाऱ्या दोन जड वाहनांनी जबर धडक झाली . या अपघातात दोन्ही वाहनांचा चुराडा झाला असून दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. 
दोन्ही वाहने  अतिशय वेगवान असल्याने दोन्ही वाहनाच्या चालक कक्षाचा अक्षरशः चेंदा मेंदा झाला व चालक उसळून पडल्याने एकाचा पाय तुकडा पडून ५ फुटावर जाऊन पाडला. या भयावह जबर धडकेत दोघे गंभीर जघमी झाल्याचे वृत्त आहे.   सदर घटनेची माहिती मिळताच वाहतूक पोलीस प्रशांत येंडे सहित चालक दिनेश मेश्राम यांनी घटना स्थळी पोहचून जखमींना  तात्काळ रुग्णालयात  दाखल करीत पुढील तपास सुरु केला आहे.  Print


News - Chandrapur | Posted : 2019-04-30


Related Photos