लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात देशात संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ५०.६० टक्के मतदान


वृत्तसंस्था /  नवी दिल्ली  :  लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील   संध्याकाळी ५ वाजेपर्यंत झालेल्या मतदानाची सरासरी टक्केवारी निवडणूक आयोगाने जाहीर केली आहे. देशात संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ५०.६० टक्के मतदान झाले आहे. तर महाराष्ट्रात ५२.०७ टक्के मतदान झालं आहे. ९ राज्यातील ७२ मतदारसंघांमध्ये हे मतदान पार पडलं. संध्याकाळी सहा वाजेपर्यंतच्या मतदानाची टक्केवारी अद्याप निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आलेली नाही. 
लोकसभेच्या चौथ्या टप्प्यात महाराष्ट्रातील १७ मतदारसंघांमध्ये आज मतदान झालं. संध्याकाळी ५ वाजेपर्यंत महाराष्ट्रातील या सर्व सात मतदारसंघांची मतदानाची आकडेवारी आयोगाने दिलीय. संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सर्वाधिक मतदान नंदुरबामध्ये झालं. महाराष्ट्रात शांततेत मतदान पार पडलं. 

मतदानाची आकडेवारी (टक्क्यांमध्ये) पुढील प्रमाणेः 

१. नंदुरबार - ६२.४४ 
२. धुळे - ५०.९७ 
३. दिंडोरी - ५८.२० 
४. नाशिक - ५३.०९ 
५. पालघर - ५७.६० 
६. भिवंडी - ४८.९० 
७. कल्याण - ४१.६४ 
८. ठाणे - ४६.४२ 
९. मुंबई उत्तर - ५४.७२ 
१०. मुंबई उत्तर पश्चिम - ५०.४४ 
११. मुंबई ईशान्य - ५२.३० 
१२. मुंबई उत्तर मध्य - ४९.४९ 
१३. मुंबई दक्षिण उत्तर - ५१.५३ 
१४. मुंबई दक्षिण - ४८.२३ 
१५. मावळ - ५२.७४ 
१६. शिरूर - ५२.४५ 
१७. शिर्डी - ५६.१९   Print


News - World | Posted : 2019-04-29


Related Photos