राजुरा येथील प्रकरण : मुलीची छेड़खानी केली म्हणून केला खून , दोन आरोपीना अटक


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / राजुरा
: शहरातील इंदिरानगर परिसरातील संदेश रवि ठाकुर या इयत्ता दहावीत शिकणाऱ्या  मुलाच्या खुनाचा उलगडा पोलीसांनी केला असुन या प्रकरणी राकेश उर्फ बाल्या वाघमारे (२८) व माया सोनारकर (२५)  या दोन आरोपींना भादंवि कलम ३०२ व ३४ नुसार खुनाचा गुन्हा नोंदवून अटक केली आहे.
प्राप्त माहितीनुसार मृत संदेश ठाकुर हा मुलगा माया सोनारकर हिच्या घरी मध्यप्रदेश मधून आलेल्या एका पाहुण्या मुलीला छेडत होता. मागील वर्षीही संदेशने या मुलीला त्रास दिला होता. अनेकदा समजून सांगुनही तो ऐकत नव्हता. अखेर संतापून माया सोनारकरने तिच्या परिचीत असलेल्या राकेश वाघमारेला ही माहिती दिली. 
रविवारच्या रात्री दहा वाजता राकेशने संदेशला बोलावून शिवाजी महाविद्यालयाच्या मैदानावर नेले. तेथे अंधार असलेल्या भागात नेऊन राकेश ने काडीने संदेशच्या डोक्यावर प्रहार केला. तो तेथे कोसळल्यानंतर लाथाबुक्क्याने मारहाण केली. यातच संदेश चा मृत्यू झाला. यावेळी माया सोनारकर तेथे उपस्थित होती. रात्री १०.४५ वाजताच्या सुमारास   ही घटना घडली.
घटनेचा तपास उपविभागिय पोलीस अधिकारी शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार बाळू गायगोले व चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे यांनी केला

   Print


News - Chandrapur | Posted : 2019-04-29


Related Photos