नक्षल्यांनी अपक्ष उमेदवाराची गाडी पेटवली, जिवीतहानी नाही


वृत्तसंस्था / भोपाळ :  नक्षल्यांनी मध्य प्रदेशमधील एका अपक्ष उमेदवाराची गाडी पेटवली आहे. सुदैवाने यात कुठलीही जिवीतहानी झालेली नाही. काही दिवसांपासून मध्य प्रदेशात नक्षल्यांनी दहशत माजविली आहे. 
मध्य प्रदेशमधील बालाघाट सिवनी या मतदारसंघातील अपक्ष उमेदवार व माजी आमदार किशोर समरिते  यांच्यावर नक्षलवाद्यांनी हल्ला केला आहे. रात्री दोन वाजता ही घटना घडली. समिरिते हे दडकसा जंगलातून जात होते तेव्हा २० - २५  नक्षलवादी हत्यारासह त्यांच्या गाडीवर चालून आले आणि त्यांची गाडी जाळून टाकली. काही दिवसांपूर्वी नक्षलवाद्यांनी छत्तीसगड राज्यात भाजप आमदाराला ठार केले होते.  यामुळे नक्षल्यांनी लोकप्रतिनिधींना टार्गेट केले असल्याचे दिसून येत आहे.   Print


News - World | Posted : 2019-04-29


Related Photos