उमरविहरी येथील आंतरराष्ट्रीय जलतरणपटू सुखदेव धुर्वे परिवाराची एशियन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद


- स्व. वामनराव दिवे चॅरिटेबल ट्रस्टचे यशस्वी प्रायोजन
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर :
नागपूर शहरातील आंतरराष्ट्रीय जलतरणपटू सुखदेव धुर्वे आपल्या कुटुंबासह एलिफंटा ते गेट वे ऑफ इंडिया हे १६ कि.मी. अंतर ४ तास ३१ मिनिटात पार करून एशियन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये विक्रमाची नोंद केली आहे. असा विक्रम करणारे धुर्वे कुटुंबीय आशिया खंडात एकमेव ठरले आहे. 
या साहसी उपक्रमाची  सुरुवात सकाळी ७.५२ मिनिटाला एलिफंटा जेट्टी येथून झाली. सर्व प्रथम सार्थक धुर्वे याने सागराचे पूजन करून व श्रीफळ अर्पण करून अभियानाला सुरुवात केली. या उपक्रमाची नोंद घेण्याकरिता एशियन बुक ऑफ रेकॉर्डचे डॉ. संदीप सिंग, महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटनेचे निरीक्षक सुनील मयेकर व नील लबडे, माजी उपजिल्हाधिकारी व स्व. वामनरावजी दिवे चॅरिटेबल ट्रस्टचे मार्गदर्शक सुधीर दिवे, धनश्री दिवे, डीआयजी मुंबई कृष्णप्रकाश आदी मान्यवर उपस्थित होते.
जलतरणपटूच्या सुरक्षितेच्या दृष्टीने डॉक्ट्ररांची प्रथमोपचार चमू माऊली बोटीवरून लक्ष्य ठेवून होते. सार्थक धुर्वे याने सागरात उडी घेतल्यानंतर महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटनेचे निरीक्षक सुनील मयेकर व नील लबडे, आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक संजय बाटवे तांत्रीक भूमिका बजावत होते. प्रत्येक मिनिटाला चारही जलतरणपटूच्या हाताच्या गतीची नोंद घेत होते. सागरावरून घोंगावणारा व उंच उंच उसळणाऱ्या खाऱ्या पाण्याच्या लाटा याची तमा न बाळगता सार्थक प्रति मिनिट ८० आर्म्स या गतीने पोहोत होता मध्ये-मध्ये त्याला फिडींग देण्यात येत होतेसागरात  होती. ४ किमी अंतरानंतर आंतरराष्ट्रीय जलतरणपटू व नागपूर पोलीस कॉन्स्टेबल सुखदेव धुर्वे यांनी सागरात झेप घेऊन प्रति मिनिट १०० आर्म्स या गतीने पोहोत होता. सागरात प्रचंड लाटा असल्याने कधी लाटेवर तर कधी खाली सुखदेव विक्रम करण्याच्या हेतूने पोहोत होता त्याला त्याची पत्नी व दोन मुले प्रोत्साहन देत होते. ९ किमी. नंतर  वैशाली धुर्वे सागरात झेपावल्या. तिने फ्री स्टाईल या प्रकारात पोहायला सुरुवात केली सागराचे खरे पाणी तोंडात जाऊ न  विशिष्ट तंत्राचा वापर करीत अथांग सागरात पोहोत होत्या. प्रति मिनिट ६० आर्म्स या गतीने पोहोत होत्या. त्याचे मनोबल वाढविण्याकरीत चिमुकली तन्वी आईला सतत आवाज देऊन प्रोत्साहित करीत होती. ११ किमी नंतर ९ वर्षीय तन्वीने सागरात उडी घेऊन खाऱ्या  पाण्याचा त्रास सहन करून विपरीत परिस्थितीत प्रति मिनिट ६० आर्म्स या गतीने पोहोत होती. तिला स्पेस स्वीमर म्हणून प्राप्ती बावनकरने साथ दिली.  
हे अभियान साखळी पद्धतीने करावयाचे असल्याने शेवटी सुखदेव धुर्वेनी १२ वाजून २५ मिनिटांनी गेट वे ऑफ इंडियाचा किनारा गाठला. धुर्वे कुटुंबियांचे स्वागत करण्याकरिता गेट वे ऑफ इंडिया येथे विविध क्रीडा व समाजाच्या  संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पुष्प गुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. या अभियानाकरिता नाशिकचे क्रीडा उपसंचालक यांनी धुर्वे कुटुंबाला शुभ संदेश दिला. तर नागपूर जिल्हा जलतरण संघटनेचे सचिव डॉ. संभाजी भोसले यांनी साहसीवीरांचे अभिनंदन केले. यावेळी महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटनेचे पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ता विशाल भगत, ज्योती पटेल उपस्थित होते. 
माजी उपजिल्हाधिकारी व  स्व. वामनरावजी दिवे चॅरिटेबल ट्रस्टचे सल्लागार सुधीर दिवे, डीआयजी मुंबई कृष्णप्रकाश, आदिवासी विकास परिषदेचे माजी अध्यक्ष सतीश मडावी, राहुल पांडे, अजय उईके, नानू नेवरे, नागपूर  बॉम्ब स्कॉडच्या पी.आय. वैजंती मांडवधरे, शेखर गजभिये, विजय कोळी, प्रीतम कोळी, कुणाल कोळी, मधुकर गावित (पोलीस विभाग), निशांत राऊत (प्रशिक्षक), अमोल खोडे, अमित कडवे, मोना उईके, हर्षा बावनकर आदींनी परिश्रम घेतले. 
  या अभियानाकरिता स्व. वामनरावजी दिवे चॅरिटेबल ट्रस्ट, मिहीर सेन स्विमिन्ग अँड स्पोर्टींग क्लब, व्हिक्टोरियस, शार्क क्लब,  गॅलेनट्री, डाल्फीन स्विमींग क्लब,  कामगार कल्याण, नागपूर शहर पोलीसचे सहकार्य लाभले. 

   Print


News - Nagpur | Posted : 2019-04-28


Related Photos