एनआयए ने केरळमध्ये इसिसशी संबंधित असलेल्या तीन संशयित दहशतवाद्यांच्या घरांवर टाकले छापे


वृत्तसंस्था /  कोची : केरळमध्ये राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) इसिसशी संबंधित असलेल्या तीन संशयित दहशतवाद्यांच्या घरांवर छापे टाकले आहेत. त्या संशयित दहशतवाद्यांना ताब्यात घेतले असून त्याची चौकशी करण्यात येत आहे. या संशयितांकडे अरबी व मलयाळम भेषेत लिहलेले काही नोट्स, झाकिर नाईक व सय्यद कुतेब यांची वादग्रस्त भाषणं असलेल्या काही सीडीज सापडल्या आहे.
एनआयएने आज केरळमधील कासरगोड येथे दोन ठिकाणी तर पलक्कड येथे एका ठिकाणी छापे टाकले. केरळमधून गेल्या काही महिन्यांमध्ये २१ जण बेपत्ता झाले असून ते सर्व जण इसिसमध्ये सामिल झाल्याचा संशय एनआयएला आहे. त्य़ा २१ जणांमधील १७ हे कासरगोड जिल्ह्यातील तर ४  हे पलक्कड जिल्ह्यातील आहेत. त्यामुळे एनआयएने या २१ जणांशी संबंधित असलेल्या तिघांच्या घरांवर आज छापे मारले.  Print


News - World | Posted : 2019-04-28


Related Photos