जिल्हा प्रशासनाने रोहयोतून पाटदुरुस्तीची कामे करावी : शेतकरी कामगार पक्षाची मागणी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांच्या धानाकरीता तलावाचे पाणी शेतीपर्यंत वाहून नेण्याकरिता तयार करण्यात आलेले पाट पडझड होवून बुजलेले आहेत,त्यामुळे जिल्हा प्रशासनाने प्राधान्याने सदर पाटांच्या दुरुस्तीचे काम हाती घ्यावे अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाने केली आहे.
  शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस  रामदास जराते यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, मागील वर्षी धानाचे पीक शेवटच्या टप्प्यात असतांना चामोर्शी तालुक्यातील दिना प्रकल्पाचे पाणी पाट बुजलेले असल्याने अनेक गावातील शेतकऱ्यांच्या शेतात पाणी पोहचू शकले नाही. त्यामुळे पाण्याअभावी हजारो एकरातील धान  करपून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. हिच परिस्थिती गेल्या अनेक वर्षांपासून जिल्ह्यातील अन्य तालुक्यातही आहे. मात्र पाटदुरुस्ती सारख्या कामात स्थानिक यंत्रणेतील कर्मचाऱ्यांना कमीशन मिळत नसल्याने सदर कामे केली जात नसून दरवर्षी ऐनवेळेस थातूरमातूर डागडुजी करण्यात येते. मात्र तोपर्यंत शेतकऱ्यांचे प्रंचड नुकसान होते.
सदरचे नुकसान टाळण्यासाठी चामोर्शी तालुक्यातील दिना प्रकल्पासह जिल्ह्यातील इतर सर्व लहान-मोठ्या तलावांच्या पाटांची दुरुस्ती पावसाळ्यापूर्वी करावी व धान उत्पादक शेतकऱ्यांना जिल्हा प्रशासनाने दिलासा द्यावा अशी मागणीही शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस  रामदास जराते, महिला नेत्या जयश्री वेळदा, शामसुंदर उराडे, नरेश मेश्राम, रोहिदास कुमरे, नागेश तोरे, अक्षय कोसनकर, सुधाकर आभारे, दिनेश चुधरी, प्रदिप आभारे, गंगाधर बोमनवार, विठ्ठल दुधबळे, मारोती वैरागडे, कपील नैताम, सोनू  साखरे, वसंत गावतुरे, भक्तदास कोठारे, दामोधर रोहनकर यांनी केले आहे.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-04-28


Related Photos