पत्नीसोबत भांडण झाल्यानंतर शरीराची भूक भागविण्यासाठी पोटच्या मुलीवर बलात्कार


वृत्तसंस्था / गुरुग्राम :  पत्नीसोबत भांडण झाल्यानंतर  स्वत:च्या शरीराची गरज भागविण्यासाठी एका नराधम बापाने त्याच्या १३ वर्षाच्या मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.   याप्रकरणी मुलीच्या आईने पोलिसांत तक्रार दाखल केली असून नराधम बाप फरार झाला आहे.
 नराधम बाप  टॅक्सीचालक  असून  त्याची पत्नी ही घरकाम करून संसाराचा गाडा ओढते. २० एप्रिलला अनिल दारू पिऊन घरी आल्यानंतर शरीर सुखावरून त्या दोघांमध्ये वाद झाला. त्यामुळे अनिलने एका जड वस्तूने पत्नीच्या डोक्यावर प्रहार केला. त्यात ती जखमी झाली. त्यानंतर अनिल घराच्या गच्चीवर गेला व त्याने मुलीला जेवण आणून देण्यास सांगितले. अनिलची पत्नी ही डोक्यावरील जखमेवर उपचार करण्यासाठी रुग्णालयात गेली होती. त्यावेळी अनिलने मुलीवर बलात्कार केला. तसेच याबाबत आईला सांगितले तर जीवे मारण्याची धमकी देखील दिली. मात्र मुलीने दुसऱ्या दिवशी सकाळी तिच्यासोबत घडलेला प्रकार आईला सांगितला. याबाबत मुलीच्या आईने अनिलला जाब विचारताच त्याने तेथून पळ काढला. मात्र जाताना त्याने जर पोलिसांत तक्रार केली तर पुन्हा मुलीवर बलात्कार करेन अशी धमकी दिली. त्यानंतर पीडित मुलीच्या आईने तत्काळ पोलिसांत तक्रार दाखल केली. सध्या पोलीस आरोपी बापाचा शोध घेत आहे.  पोलिसांनी  पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.  Print


News - World | Posted : 2019-04-28


Related Photos