आलापल्ली - भामरागड मार्गावर आढळली माडीया भाषेतील नक्षल पत्रके, कसनासूर घटनेचा उल्लेख


- मृतक नक्षल्यांच्या नावांचाही केला उल्लेख
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / भामरागड :
मागीलवर्षी एप्रिल महिन्यात भामरागड तालुक्यातील कसनासूर आणि तुमिरगुंडा येथे पोलिसांनी मोठी कारवाई करीत ४०  नक्षल्यांचा खात्मा केला होता. या घटनेच्या स्मरणार्थ नक्षल्यांनी २२ ते २८ एप्रिलदरम्यान सप्ताह पाळण्याचे आवाहन करणारे माडीया भाषेतील पत्रके आलापल्ली - भामरागड मार्गावर टाकल्याचे आढळून आले आहे.
आलापल्ली - भामरागड मार्गावर आलापल्लीपासून १६ किमी अंतरावरील मेडपल्ली ते तलवाडा गावादरम्यान दोन किंमी अंतरापर्यंत नक्षल्यांनी पत्रके टाकून ठेवल्याचे आढळून आले आहेत. ही पत्रके माडीया भाषेत छापण्यात आलेली आहेत. कसनासूर चकमकीत ठार झालेल्या ४० नक्षल्यांच्या नावांचा उल्लेख केला असून २२ ते २८ एप्रिलपर्यंत सप्ताह पाळण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान या कालावधीत पोलिस विभागानेही या भागात नक्षलविरोधी अभियान तिव्र केले असून काल २७ एप्रिल रोजी गुंडूरवाही ते फुलणार परिसरात झालेल्या चकमकीत दोन महिला नक्षलींचा खात्मा केला आहे. नक्षल कारवायांवर पोलिस विभाग लक्ष ठेवून असून नक्षल्यांचे कंबरडे मोडण्यासाठी मोहिम तिव्र केली असल्याचे दिसून येत आहे.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-04-28


Related Photos