बीजापूर जिल्ह्यात नक्षल्यांच्या हल्ल्यात दोन पोलीस शहीद


वृत्तसंस्था / रायपूर :  छत्तीसगड राज्यातील  बीजापूर येथील तोंगगुडा कँम्पच्याबाहेर काल शनिवारी सायंकाळी  नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात दोन पोलीस शहीद झाले तर एक पोलीस जखमी झाला आहे. जखमी पोलिसाची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. 
 या हल्यात शहीद झालेले दोन्ही पोलीस जिल्हा पोलीस दलात कार्यरत होते. अरविंद मिंज आणि सुक्खू हपका असं या शहीद पोलिसांची नावं आहेत. नक्षलवाद्याच्या स्मॉल टीमने हा हल्ला केला असून पोलीस उपमहासंचालक सुंदरराज यांनी या हल्ल्याची पृष्टी केली आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या पोलिसाला चेरला येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.    Print


News - World | Posted : 2019-04-28


Related Photos