गट्टा बॉम्बस्फोटप्रकरणातील आरोपीस न्यायालयीन कोठडी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस  
प्रतिनिधी / गडचिरोली  :
लोकसभा निवडणुकीदरम्यान  गट्टा येथील मतदान केंद्राजवळ झालेल्या बॉम्बस्फोटप्रकरणी  पोलीसांनी एका आरोपीला अटक केली आहे. निलेश  पदा (१८) रा. झारेवाडा असे आरोपीचे नाव आहे. त्याला न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने १० दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी गट्टावरुन वटेली गावाच्या बुथवर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पथकाला लक्ष्य करुन नक्षल्यांनी १० एप्रिल रोजी एक सायकलवर ठेवलेल्या रिमोट कंट्रोल बॉम्बचा स्फोट घडवुन आणला होता. या स्फोटात केंद्रीय राखीव पोलीस दलाचा एक जवान जखमी झाला होता.  पोलीसांनी या घटनेचा कसून तपास करून आरोपी निलेश पदा याला २५ एप्रिल रोजी अटक केली. त्याला न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने १० दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.अधिक तपास एसडीपीओ शशिकांत भोसले यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-04-27


Related Photos