बहुजन समाज पार्टी विधानसभा बल्लारपूर ची समिक्षा बैठक संपन्न
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / बल्लारपूर : बहुजन समाज पार्टी चे अध्यक्ष सुश्री मायावती यांच्या दिशानिर्दैशा नुसार संपूर्ण महाराष्ट्रात विधानसभा स्तरावर समिक्षा व संघटन बांधणी सुरू आहे. ४ ऑगस्ट २०२३ बल्लारपूर विधानसभा ची समीक्षा बैठक विश्राम गृहात संपन्न झाली.
या बैठकीला प्रमुख मार्गदर्शक भीम राजभर प्रदेश प्रभारी, अँड संदीप ताजने प्रदेश अध्यक्ष, ॲड सुनील डोंगरे प्रदेश प्रभारी प्रमुख उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांनी पदाधिकारी कार्यकर्ते यांना मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हा प्रभारी प्रा. राजेश ब्राम्हणे, जिल्हा अध्यक्ष मुक्कदर मेश्राम यांनी मार्गदर्शन केले.
विधानसभा पदाधिकारी, विधानसभा अध्यक्ष ॲड पप्पू गेडाम, अजय भेलके, शिवपूजन वर्मा, नरेश मेश्राम, मनोज जांभुळे सह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
News - Chandrapur