लवकरच चलनात येणार २० रुपयांची नवी नोट


वृत्तसंस्था / नवी दिल्ली : ५०० आणि १००० रुपयांच्या नोटाबंदीनंतर रिझर्व्ह बँकेने ५०० आणि २००० रुपयांच्या नवीन नोटांसह २०० रुपये, १०० रुपये, ५०० रुपये आणि १० रुपयांच्या नवीन नोटा चलनात आणल्या . आता लवकरच २० रुपयांची नवी नोटही  चलनात येणार आहे.
रिझर्व्ह बँकेकडून लवकरच २० रुपयांची नवी नोट जारी करण्यात येणार आहे. नवीन वैशिष्ट्ये आणि नव्या रंगातील ही नोट चलनात येणार आहे. या नोटेचा फोटो आणि वैशिष्ट्ये याची माहिती रिझर्व्ह बँकेकडून देण्यात आली आहे. या नव्या नोटेचा रंग हिरवट पिवळा असेल. या नोटेवर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांची स्वाक्षरी असणार आहे. या नोटेच्या मागील बाजूस हिंदुस्थानचा सांस्कृतिक वारसा असलेल्या वेरुळ लेणींचे चित्र असेल. खरी नोट ओळखता यावी यासाठी काही विशिष्ट चिन्हांचा आणि खुणांचा वापर या नोटेवर करण्यात आला आहे. तसेच २० रुपयांच्या आताच्या नोटाही चलनात राहणार आहेत.   Print


News - World | Posted : 2019-04-27


Related Photos