नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणे देशहितासाठी आवश्यक : डॉ. गोविंद कुलकर्णी


- राष्ट्रीय लोकशाही आघाडीला अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचा पाठिंबा
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
 शाहरुख मुलाणी / मुंबई :
देशहितासाठी नरेंद्र मोदी हेच पुन्हा पंतप्रधान होणे आवश्यक असल्याने अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील महायुतीला पाठिंबा जाहीर केला आहे, अशी घोषणा अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. गोविंद कुलकर्णी यांनी केली. महाराष्ट्रात ब्राह्मण समाजाचा उमेदवार असलेल्या मतदारसंघात पक्ष न पाहता मतदान करण्याचे आवाहनही त्यांनी केले. औरंगाबाद येथे नुकत्याच झालेल्या महासंघाच्या प्रदेश कोअर कमिटीच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला.
राष्ट्राबाबत संवेदनशील असणारे, देशाला आर्थिक उन्नतीकडे नेणारे तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे महत्त्व अधोरेखीत करणारे, भ्रष्टाचारविरहित सरकार देणारे व देशाला खंबीर नेतृत्व प्रदान करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडीला एनडीए समाजबांधवांनी मतदान करावे, अशा अशयाचा ठराव बैठकीत करण्यात आला. महासंघाने विविध पक्षांनी निश्चित केलेल्या ब्राह्मण उमेदवारांना पाठिंबा जाहीर केला आहे. महाराष्ट्रात भाजपा उमेदवार नितीन गडकरी, पूनम महाजन, राष्ट्रवादी काँग्रेस  उमेदवार आनंद परांजपे, काँग्रेस चे उमेदवार संजय निरुपम या चार ब्राह्मण उमेदवारांचा त्यात समावेश आहे. पुण्यामध्ये भाजपा उमेदवार गिरीश बापट व काँग्रेस उमेदवार मोहन जोशी हे दोन्ही उमेदवार ब्राह्मण समाजाने असल्याने महासंघाने तटस्थ राहण्याची भूमिका घेतली होती, असे डॉ. कुलकर्णी यांनी स्पष्ट केले. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने गेल्या बारा वर्षांमध्ये ब्राह्मण समाजात राजकीय जागृती निर्माण केली आहे. गेल्या १२ वर्षांपूर्वीच्या काळात ब्राह्मण संघटना फक्त आणि फक्त सेवा कार्यापुरतीच मर्यादित होती. सामुहिक उपनयन, दहावी-बारावी यशस्वी विद्यार्थी गुणगौरव, कोजागरी पौर्णिमा, वधु-वर मेळावा, विवाह संमेलने या अंतर्गत गेट-टुगेदर सारखे आयोजित केले जात होते. महासंघाने ब्राह्मण समाजाच्या हक्कांसाठी, अधिकारांसाठी लढा उभारणे, राजकीय व्यवस्थेत आपला सहभाग ठेवणे, असे अनेक उपक्रम सतत राबविले आहेत. यामुळे ब्राह्मण संघटनेमध्ये एक प्रकारे नवचैतन्य निर्माण झाले आहे. त्याचा परिणाम म्हणून ब्राह्मण संघटनेने इतका दबदबा निर्माण केला की 2014 मधील सार्वत्रिक निवडणुकांसाठी पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये एक तरी ब्राह्मण उमेदवार एका तरी पक्षाने निश्चित करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली होती, परंतु दुर्दैवाने एकाही राजकीय पक्षाने ब्राह्मण उमेदवारास उमेदवारी देण्याबाबत समर्थता दर्शविली नाही. पुढील पाच वर्षांनंतरच्या काळात दोन्ही प्रमुख राजकीय पक्षांना ब्राह्मण समाजातील उमेदवाराला उमेदवारी देण्याशिवाय पर्याय शिल्लक राहिला नसल्याने दोन्ही पक्षांनी ब्राह्मण उमेदवार देण्याचे निश्चित केले, याकडे डॉ. कुलकर्णी यांनी लक्ष वेधले.  
विविध पक्षातील कुशल नेतृत्व देणाऱ्या काही प्रमुख नेत्यांना, भाजपमधील आयाराम-गयारामांसारख्या अयोग्य उमेदवारांना नाकारून योग्य उमेदवारास निवडून द्यावे. या प्रमाणे तीन निर्णय घेतले आहेत. विविध विधानसभा निवडणुकांमध्ये केलेला 'नोटा' या पर्यायाचा वापर लोकसभा निवडणुकीत अजिबात करू नये, असे आवाहन केले आहे. तसेच 'शत प्रतिशत मतदान' अभियानातून शंभर टक्के मतदान करवून घेण्यासारखे अनेक उपक्रम महासंघ राबवीत आहे. सर्व समाज बांधवांना आग्रहपूर्वक विनंती करण्यात येत आहे की, आपला मतदानाचा हक्क निश्चितच बजावावा, असे आवाहन अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने केले आहे.  Print


News - Rajy | Posted : 2019-04-27


Related Photos