खाजगी शाळांच्या गुरुजींची वर्गतुकड्या टिकविण्यासाठी धडपड


- पालकांना विविध प्रलोभने 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी /  खाबांडा  :
परिसरातील खाजगी शाळांचे  गुरुजी आपल्या शाळेच्या वर्गतुकड्या टिकवण्यासाठी गावागावात विद्यार्थ्यांसाठी  शोध मोहीम राबवितांना दिसत आहे. पालकाने मुलाचे नाव आमच्या शाळेत दाखल केले पाहिजे म्हणून विविध प्रलोभने दाखविण्यात येत आहे.
 खाबांडा परिसरात चार ते पाच खाजगी शिक्षण संस्था आहेत.  सध्या प्रत्येक पालकांना आपल्या मुलाने इंग्रजी शाळेत शिकाव असे वाटते.  यामुळे शासकिय मराठी शाळांची  पटसंख्या कमी होण्याच्या मार्गावर आहे आणि पटसंख्या नूसार शिक्षक कार्यरत असतो.  यातून खाजगी शिक्षणसंस्था सुटल्या नाहीत. जून्या खाजगी संस्थेच्या वर्ग तुकड्यांची मंजुरी टिकवण्यासाठी विद्यार्थ्यांची भरपाई करणे महत्त्वाचे झाले आहे. परिणामी विद्यार्थी मिळाले नाही तर वर्गतुकड्या तुटल्याशिवाय राहत नाही . यामुळे शिक्षण संस्थेच्या संचालक मंडळीकडून शिक्षण तूकड्या टिकवण्यासाठी मोठ्या शर्थीचे प्रयत्न करण्यात येते.
सध्या शिक्षकांना सुट्या असल्यातरी रोज सकाळी शिक्षक गावागावात जावुन विद्यार्थ्यांचा शोध घेताना दिसून येत आहेत आणि आपल्या शिक्षण संस्थेच्या सुविधेची जाणीव करून पाल्याना आकर्षित करीत आहेत.  मात्र या शाळांची शैक्षणीक गुणवत्ता ढासळलेली असल्याने विद्यार्थी मात्र शहरात शिक्षणासाठी जाणे पंसत करत आहेत. 
      शिक्षण संस्थानी शैक्षणिक गुणवत्तेत सुधारणा केल्यास या शाळेत विध्यार्थ्यांचा कल वाढल्याशिवाय राहणार नाही मात्र शाळेच्या वर्ग तुकड्या टिकवण्यासाठी शिक्षक पालकांना गुणवत्तेचे धडे देत आहे. मागील पंधरा दिवसापासून एक गाव एक शिक्षक पिंजुन काढित आहे, व विध्यार्थ्यांच्या पालकाकडे रोज येरझारा मारून प्रवेश मिळवण्यासाठी शर्तीचा प्रयत्न शिक्षक करीत आहेत.  Print


News - Chandrapur | Posted : 2019-04-27


Related Photos