महत्वाच्या बातम्या

 राष्ट्रसंत तुकडोजी महाराज संघातर्फे स्वच्छता अभियान


विदर्भ न्युज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज संघातर्फे चंद्रपूर शहर स्वच्छता व सौंदर्यीकरण लीग स्पर्धेअंतर्गत शहिद भगत सिंग चौक स्वच्छता मोहीम राबविण्यात आले.
महानगरपालिकातर्फे स्पर्धेची घोषणा केल्यानंतर आवाहनाला प्रतिसाद देत माजी नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार यांच्या नेतृत्वात प्रभागातील नागरिकांनी एस. टी. वर्कशॉप जवळील शहिद भगत सिंग चौक परिसरात स्वच्छता मोहीम सुरु केली. याप्रसंगी नागरिकांनी मोठ्या संख्येने परिसराची स्वच्छता करण्यास सहभाग दर्शविला.
१ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर २०२२ या कालावधीत माझ्या शहरासाठी माझे योगदान या थीमवर ही वार्डस्तरीय स्पर्धा सुरु झाली असुन स्वच्छता मोहीमेत लोकसहभाग वाढावा या उद्देशाने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहेत. सदर स्पर्धेत एका गटात कमीत कमी २५ नागरीक याप्रमाणे ३३ गट स्पर्धेत सहभागी झाले आहेत.





  Print






News - Chandrapur




Related Photos