महत्वाच्या बातम्या

 महसूल सप्ताहानिमित्य नवमतदारांना मतदार नोंदणीबाबत मार्गदर्शन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : महसूल सप्ताहानिमित्य उपविभागीय अधिकारी कार्यालय व तहसिल कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने विकास भवन, वर्धा येथे नवमतदारांसाठी युवा संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना मतदार नोंदणी बाबत मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी दिपक कारंडे होते तर प्रमुख अतिथी म्हणून तहसीलदार रमेश कोळपे, नायब तहसीलदार अजय धर्माधिकारी, निवडणूक शाखेचे नायब तहसिलदार आर.बी मसराम, यशवंत महाविद्यालयाचे प्राचार्च डॉ. रविंद्र बेले, बजाज कॉलेज ऑफ विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य प्रदिप रामटेके व अन्य मान्यवर उपस्थित होते. या युवा संवाद कार्यक्रमात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मतदार यादीत नाव नोंदणी, दुरुस्ती करणे व मतदार यादीत नावाचा शोध घेणे, निवडणूक प्रक्रियेत युवकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग वाढविणे, महाविद्यालयामार्फत मतदान जनजागृती करणे आदी विषयावर उपविभागीय अधिकारी दिपक कारंडे यांनी मार्गदर्शन केले.

तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना निवडणूक विषयी व इतर प्रशासकीय बाबी संबंधीत येत असलेल्या समस्या जाणून घेऊन त्यांच्या समस्याचे निराकरण करण्यात आले. कार्यक्रमाला मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, पर्यवेक्षक व निवडणूक विभागाचे कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





  Print






News - Wardha




Related Photos