महत्वाच्या बातम्या

 प्रलंबित तडजोडीस पात्र व वाद दाखलपुर्व प्रकरणे सादर करण्याचे आवाहन


- राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणच्या निर्देशाप्रमाणे जिल्हा व सत्र न्यायालय, वर्धा तसेच हिंगणघाट, पुलगाव, आर्वी, आष्टी, कारंजा, सेलू, समुद्रपूर येथील तालुका न्यायालयांमध्ये ९ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. या अदालतमध्ये प्रकरणे दाखल करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या अदालतमध्ये न्यायालयातील प्रलंबित तडजोडीस पात्र दिवाणी व फौजदारी प्रकरणे, १३८ एन.आय.ॲक्ट प्रकरणे, भुसंपादन प्रकरणे, कौटुंबिक प्रकरणे, मोटार वाहन अपघात दावा प्रकरणे, दरखास्त प्रकरणे, ग्राहक तक्रार न्याय निवारण प्रकरणे, बँकेशी संबंधित प्रकरणे तसेच वाद दाखल पूर्व प्रकरणामध्ये टेलीफोन, मोबाईल कंपनीसंबंधित वाद दाखलपूर्व प्रकरणे राष्ट्रीय लोक अदालतसमोर ठेवण्यात येणार आहे.  

या अदालतीमध्ये न्यायालयातील तडजोडीस पात्र प्रलंबित तसेच वाद दाखलपूर्व प्रकरणे दोन्ही पक्षकारांच्या सहमतीने आपसी तडजोडीने निकाली काढण्यात येणार आहे. करीता पक्षकार, अधिवक्ता तसेच नागरिकांनी राष्ट्रीय अदालत समोर प्रकरणे मोठ्या प्रमाणात ठेऊन आपसी तडजोडीने निकाली काढावीत.

अदालतीमध्ये पक्षकारांना आपली बाजू मांडण्याची संधी मिळते तसेच दोन्ही पक्षकारांना मान्य असलेली तडजोड पक्षकारांच्या आपसी सहमतीने होते. त्यामुळे राष्ट्रीय लोक अदालतमध्ये झालेल्या न्यायनिवाड्याच्या जडजोडीचे समाधान दोन्ही पक्षकारांना मिळते. त्यामुळे पक्षकारांनी ९ सप्टेंबर रोजी आयोजित राष्ट्रीय लोक अदालतमध्ये मोठ्या प्रमाणात प्रकरणे तडजोडीकरीता ठेवावीत, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव विवेक देशमुख यांनी केले आहे.





  Print






News - Wardha




Related Photos