१९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी अब्दुल गनी याचा नागपूरमधील कारागृहात मृत्यू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर :
  १९९३ मधील मुंबई  बॉम्बस्फोट प्रकरणाच्या  खटल्यात दोषी ठरलेल्या अब्दुल गनी याचा आज २५  एप्रिल रोजी नागपूरमधील कारागृहात मृत्यू झाला. 
अब्दुल गनी हा गेल्या काही दिवसांपासून आजारी होता . त्याच्यावर नागपूरमधील रुग्णालयात उपचार सुरु होते.  ४८ वर्षीय अब्दुल गनी हवाला एजंट होता. 
 या खटल्यातील मुख्य आरोपींपैकी एक असलेल्या टायगर मेमनच्या हवाला रॅकेटमध्ये तो काम करत होता. अब्दुल गनीने १९९३ च्या बॉम्बस्फोटात आरडीएक्सने भरलेली कार मेमनच्या घरापासून सेंच्युरी बाजार येथे नेली आणि उडीपी हॉटेलजवळ पार्क केली. या स्फोटात ११३ जणांचा मृत्यू झाला आणि २२९ जण जखमी झाले. तर तब्बल २ कोटी ४१ रुपयांचे नुकसान झाले होते.
  न्यायालयाने गनीला १४ कलमांखाली दोषी ठरवत शिक्षा सुनावली होती. नागपुरमधील कारागृहात तो शिक्षा भोगत होता. गेल्या काही दिवसांपासून तो आजारी होता आणि त्याच्यावर नागपूरमधील सरकारी रुग्णालयात उपचार सुरु होते. अखेर आज दुपारी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.  Print


News - Nagpur | Posted : 2019-04-25


Related Photos