३० वर्षांच्या प्रयत्नानंतर मिळाली मलेरियावर लस , ‘मलेरिया दिन’ विशेष


वृत्तसंस्था / नवी दिल्ली : आज २५ एप्रिल रोजी ‘मलेरिया दिन’ साजरा केला जात आहे. या दिनाच्या पार्श्वभूमीवर आफ्रिका देशाच्या मलावा येथे मंगळवारी जगातील पहिली मलेरिया लस लाँच करण्यात आली. ३० वर्षांच्या प्रयत्नानंतर लस तयार करण्यात यश मिळाल्याचे डब्ल्यूएचओचे संचालक टेड्रो अदनोम घेब्रेयियस यांनी सांगितले . ही लस ५ महिन्यांच्या बालकापासून ते २ वर्षांपर्यंतच्या मुलापर्यंत देता येऊ शकते. जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) ट्विटद्वारे ही माहिती दिली.
डब्ल्यूएचओचे संचालक टेड्रो अदनोम घेब्रेयियस यांनी सांगितले की, गेल्या अनेक वर्षांत मलेरियावर नियंत्रण आणण्यासाठी आम्ही बरेच प्रयत्न केले. पण काहीच साध्य झाले नाही. पण आता तब्बल ३० वर्षांनंतर आम्ही या रोगावर ही लस बनवली आहे. या लसीमध्ये हजारो मुलांना वाचवण्याची क्षमता आहे. ही लस प्लाज्मोडियम फाल्सीपेरमच्या विरुद्ध काम करते, असे संशोधकांनी पुढे स्पष्ट केले. एकीकडे भारतात मलेरिया या रोगामुळे मुले अगदी कमी वयाची असतानाच दगावतात. भारतात २०१६ मध्ये मलेरियाच्या दहा लाख ९० हजार ७२४ प्रकरणांची नोद झाली, तर यातल्या ३३१ जणांनी याच रोगामुळे प्राण गमावले.
News - World | Posted : 2019-04-25