महत्वाच्या बातम्या

 उपराष्ट्रपतींच्या दौऱ्यानिमित्त वाहतूक मार्गात बदल  


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : उपराष्ट्रपती  जगदीप धनखड उद्या ४ ऑगस्ट रोजी नागपूर दौऱ्यावर येणार आहे. त्याअनुषंगाने त्यांच्या सूरक्षेच्या दृष्टीकोनातून वाहतूक पोलीसांकडून वाहतूकीच्या दृष्टीने दौरा कालावधीत आवश्यकतेनुसार विविध ठिकाणी वाहतूक तात्पुरती थांबविण्यात आणि वळविण्यात येणार आहे.  
४ ऑगस्ट रोजी  सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत  वर्धा रोड कडून येणारी वाहतूक जामठा टी-पॉईन्ट येथे थांबविण्यात येईल किंवा त्यांचे सोयीनुसार वळवतील. तसेच नागपूर ते कोराडी, छिंदवाडा रोड या मार्गावरील संपूर्ण जड वाहतूक बंद राहील व नांदा फाटा येथे थांबवतील. उमरेड रोड दिघोरी नाका ते नागपूर कडे येणारी संपूर्ण जड़ वाहतुक ही बंद राहील. वाहन चालकांनी या दरम्यान आउटर रिंग रोडचा व आवश्यकतेनुसार इतर मार्गाचा वापर करावा. कोणतीही जड वाहतूक शहरात येणार नाही याची दक्षता घेण्यात आली आहे. 

कर्तव्यावरील अधिकारी, अंमलदार यांना आवश्यकतेनुसार वाहतूक वळविण्याचे व थांबविण्याचे अधिकार प्रदान करण्यात आले आहे. तरी नागरीकांनी आपली गैरसोय होवू नये म्हणुन आवश्यक त्या इतर मार्गाचा वापर करून आपले प्रवासाचे नियोजन करावे. ही अधिसूचना ४ ऑगस्ट रोजी सकाळी ६ ते सायं. १० पर्यंत अंमलात राहील. तरी नागपूर शहरातील सर्व वाहन चालकांनी  पोलीसांना सहकार्य करावे असे आवाहन वाहतूक पोलीस उपआयुक्त चेतना तिडके यांनी केले आहे.





  Print






News - Nagpur




Related Photos