श्रीलंकेत पुन्हा एकदा स्फोट : कोलंबो पुन्हा हादरले


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / कोलंबो :
श्रीलंकेची राजधानी कोलंबोमध्ये आज पुन्हा एकदा स्फोटाचा आवाज आला आहे. पुगोडा शहरात जोरदार स्फोट झाला असून राजधानी कोलंबोपासून ४० किलोमीटर अंतरावर हा स्फोट झाल्याची माहिती मिळत आहे. जगभरात ईस्टर संडे साजरा होत असताना रविवारी श्रीलंकेमधील कोलंबो येथे चर्च आणि हॉटेलना लक्ष्य करून आठ ठिकाणी बॉम्बस्फोट झाले. या बॉम्बस्फोटात ३५९ हून अधिक जणांचा मृत्यू झाला तर ५०० हून अधिक जण जखमी झाले. या घटनेनंतर संपूर्ण श्रीलंकेत भीतीचे वातावरण पसरले आहे.
कोलंबोतील साखळी बॉम्बस्फोटांची जबाबदारी कुख्यात दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटने स्वीकारली आहे. रविवारी घडवून आणलेल्या या साखळी बॉम्बस्फोटांमुळे आतापर्यंत सुमारे ३५९ जणांचा मृत्यू झाला असून, शेकडोजण जखमी झाले आहेत. दरम्यान, ख्राईस्टचर्च येथील मशिदीवर झालेल्या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी श्रीलंकेमध्ये चर्च आणि हॉटेलला लक्ष्य करून हे बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आल्याचे श्रीलंकन सरकारने संसदेत सांगितले होते.  श्रीलंकेतील स्थानिक इस्लामी कट्टरवादी संघटना नॅशनल तौहीद जमात (एनटीजे) हिचा या साखळी बॉम्बस्फोटांमागे हात असल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र कुठल्याही संघटनेने आतापर्यंत या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नव्हती. अखेरीस इस्लामिक स्टेटने या साखळी बॉम्बस्फोटांची जबाबदारी स्वीकारली. इस्लामिक स्टेट या दहशतावी संघटनेने अल अमाक या यासंदर्भातील वृत्त एका  वृत्तसंस्थेने दिले होते.   Print


News - World | Posted : 2019-04-25


Related Photos