महत्वाच्या बातम्या

 सामाजिक न्याय विभागाच्या विविध पुरस्कारासाठी अर्ज आमंत्रित


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : सामाजिक न्याय विभागाच्यावतीने समाज कल्याण क्षेत्रात कार्य करणा-या नोंदणीकृत स्वयंसेवी संस्था व उल्लेखनीय कार्य करणा-या समाजसेवक व्यक्तींना दरवर्षी विविध पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. इच्छुक पात्र संस्था व व्यक्तींकडून यावर्षीच्या पुरस्कारासाठी अर्ज मागविण्यात येत आहे.

सन २०१९-२० ते २०२२-२३ या चार आर्थिक वर्षासाठी देण्यात येणारा डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार, पद्मश्री कर्मविर दादासाहेब गायकवाड पुरस्कार, संत रविदास पुरस्कार, शाहू फुले आंबेडकर पारितोषिक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय प्राविण्य पुरस्कार अशा विविध पुरस्कारासाठी अर्ज मागविण्यात येत आहे.

यापुर्वी अर्जदार संस्था यांनी सन २०१९-२०, २०२०-२१ व २०२१-२२ या आर्थिक वर्षाकरीता अर्ज केला आहे. त्यांना नव्याने या पुरस्कारासाठी अर्ज करण्याची आवश्यकता नाही. त्यांनी ज्या वर्षाकरीता अर्ज केला आहे. त्या वर्षाकरिताचे चारित्र्य पडताळणी अहवाल सादर करावा.

संबंधित कालावधीकरीता पूर्वी अर्ज केलेल्या व्यक्तींनी पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही. ज्या वर्षासाठी व ज्या पुरस्काराकरीता अर्ज करण्यात येत आहे, त्या वर्षासाठी त्या पुरस्काराकरीता विहित केलेल्या अटीची पुर्तता करणे आवश्यक राहील. इच्छुक पात्र व्यक्ती व संस्थानी १५ ऑगस्ट पर्यंत आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करावे, असे समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त प्रसाद कुळकर्णी यांनी कळविले आहे.





  Print






News - Wardha




Related Photos