महत्वाच्या बातम्या

 डीएलएड प्रवेशासाठी शासकीय कोट्यातील रिक्त जागांसाठी अर्ज आमंत्रित


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : राज्यातील अद्यापक विद्यालयातील शासकीय कोट्यातील डीएलएड प्रथम वर्ष ऑनलाईन प्रवेशाच्या तीन फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर रिक्त राहिलेल्या जागा विशेष फेरीद्वारे ऑनलाईन पध्दतीने भरण्यात येणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज करावे, असे आवाहन करण्यात आहे.

संबंधित जिल्ह्यातील अद्यापक विद्यालयनिहाय रिक्त जागांचा तपशिल परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून प्रथम येणा-यास प्रथम प्राधान्य पध्दतीने ऑनलाईन प्रवेश दिल्या जाणार आहे. विद्यार्थ्यांनी ७ ऑगस्ट पर्यंत परिषदेच्या www.maa.ac.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावे. पडताळणी अधिकाऱ्यांनी ९ ऑगस्ट पर्यंत प्रमाणपत्राची ऑनलाईन पध्दतीने पडताळणी करावी. या विशेष फेरीमधून इयत्ता १२ उत्तीर्ण झालेले व नव्याने प्रवेश अर्ज भरण्यास इच्छुक असलेले विद्यार्थी, नियमित डीएलएड प्रवेश प्रक्रियेत ऑनलाईन अर्ज पूर्ण न भरलेले, सबमिट अप्रुव्ह न केलेले विद्यार्थी भाग घेऊ शकतील.

ज्या विद्यार्थ्यांना नियमित प्रवेश प्रक्रियेमध्ये अद्यापक विद्यालय मिळाले नाही. अशा विद्यार्थ्यांनी त्यांचे प्राधान्यक्रम बदलून द्यावेत. ज्या अद्यापक विद्यालयात जागा रिक्त आहे, त्या अद्यापक विद्यालयाचा पसंतीक्रम द्यावा. ज्या विद्यार्थ्यांनी यापूर्वी डीएलएड ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत प्रवेशासाठी ऑनलाईन शुल्क भरले आहे, त्यांनी विशेष प्रवेश फेरीसाठी नव्याने शुल्क भरण्याची आवश्यकता नाही. परंतु त्यासाठी जो मेल आयडी व मोबाईल नंबर रजिस्टर केला आहे तोच मेलआयडी व मोबाईल नंबर वापरणे आवश्यक आहे.

विद्यार्थ्यांनी पुर्वीप्रमाणेच संकेतस्थळावर जाऊन स्वत: परिपूर्ण अर्ज भरावा. अर्ज अप्रुव्ह झाल्यानंतर स्वत:चे लॉगीन उघडावे. लॉगीन केल्यानंतर ७ वी स्टेप ओपन करावी व तेथील क्लीक टू फाईंड सीट अँन्ड टेक ॲडमीशन यावर क्लीक करावे. ज्या विद्यालयात प्रवेश घ्यावयाचा आहे, त्याचा विभाग, जिल्हा, अद्यापक विद्यालय प्रकार निवडावा. ज्या अद्यापक विद्यालयात जागा रिक्त आहेत ते अद्यापक विद्यालय निवडावे व तेथील टेक ॲडमीशन या बटनवर क्लीक करावे, पुन्हा एकदा हवे असलेलेच अद्यापक विद्यालय निवडल्याची खात्री करावी व नंतरच येस कन्फर्म सीट या बटणवर क्लीक करावे.

एकदा क्लीक केल्यानंतर यामध्ये पुन्हा बदल करता येणार नाही. अद्यापक विद्यालय निवडल्यानंतर प्रवेशपत्राची प्रिंट काढून घ्यावी. चार दिवसांच्या आत अद्यापक विद्यालयात जाऊन प्रवेश घ्यावा, असे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्यांनी कळविले आहे.





  Print






News - Wardha




Related Photos