घोट - मुलचेरा मार्गावर दुचाकी अपघातात तरूणाचा मृत्यू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : 
घोट - मुलचेरा मार्गावरील  निकतवाडा गावापासून १ किलोमीटर अतंरावर दुचाकीचा  अपघात होवून युवकाचा  मृत्यू झाल्याची  घटना आज २४ एप्रिल रोजी दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास घडली. 
अनिल परशुराम शेट्टीवार (२८) रा वरूर ता. चामोर्शी  असे मृतकाचे नाव आहे.  अनिल हा वरुर येथून एमएच ३३ एल ६६४६ या क्रमांकाच्या दुचाकीने  कोपरअल्ली येथे सासुरवाडीला जात असतांना   दुचाकी  वरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाला. अपघातानतंर लगेच गंभीर अवस्थेमध्ये त्याला घोट येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात  दाखल करण्यात आले.  मात्र उपचारादरम्यान  त्याचा मृत्यू झाला.  अनिल याचा  १ महिन्यापूर्वीच विवाह  झाला होता.  त्याच्या अचानक अपघाती मृत्यूने दोन्ही कुटूबांवर दुःखाचे  डोंगर कोसळले आहे.   घटनेची घोट पोलिसांनी  नोंद केली आहे.   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-04-24


Related Photos