पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी २६ एप्रिल रोजी वाराणसीत घेणार पत्रकार परिषद


वृत्तसंस्था / नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी   यांनी सत्तेच्या काळात एकदाही पत्रकारांच्या प्रश्नाला सामोरे गेले नाहीत. यावरूनही विरोधकांनी हल्लाबोल केला.  पंतप्रधान पत्रकार परिषद घेत नाहीत या आरोपाला उत्तर देण्यासाठी पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २६  एप्रिल रोजी निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवशी  वाराणसीत पत्रकार परिषद घेणार आहेत.  मात्र अद्यापपर्यंत भाजपाकडून अशी कोणतीही पत्रकार परिषद होणार नसल्याचं स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. 
वाराणसी येथील हॉटेल ताज गंगा येथे दुपारी १२.३० वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पत्रकार परिषद होणार आहे. उमेदवारी अर्ज भरुन झाल्यानंतर मोदी पत्रकारांच्या प्रश्नाला सामोरे जाणार आहेत. संपूर्ण पाच वर्षाच्या सत्ता काळात नरेंद्र मोदी यांनी कधीही पत्रकार परिषद घेतली नाही. त्यामुळे विरोधकांकडून त्यांच्यावर आरोप होत होते. पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर द्यायला नरेंद्र मोदी घाबरतात अशी टीका विरोधकांकडून मोदींवर वारंवार केली जाते. त्यामुळे पहिल्यांदाच होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्रकार परिषदेची उत्सुकता विरोधकांसोबत   पत्रकारांनाही  आहे. 

   Print


News - World | Posted : 2019-04-24


Related Photos