आ. वडेट्टीवार , आ. धानोरकर आणि माजी आमदार धोटे यांना राज्य महिला आयोगाची नोटीस


- लैंगिक शोषण घटनेप्रकरणी असंवेदनशील वक्तव्य भोवले 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर :
राजुरा येथील माजी आमदार व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे यांच्या संस्थेच्या आदिवासी वसतिगृहातील अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषण प्रकरणी पत्रकार परिषदेत असंवेदनशील वक्तव्य केल्याबाबत  राज्य महिला आयोगाने काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार , काँग्रेसचे लोकसभा निवडणुकीतील उमेदवार बाळू धानोरकर आणि माजी आमदार व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे यांना   नोटिस बजावली आहे . तिन्ही नेत्यांना ३० एप्रिल रोजी आयोगासमोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
राजुरा येथील  वसतीगृहातील लहान मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणाबाबत बोलत असताना काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे यांनी   ३ - ५ लाखांच्या मदतीसाठी पॉस्को तक्रारींमध्ये वाढ झाली असे  अत्यंत संतापजनक विधान केले .  यामुळे त्यांच्याविरुद्ध तीव्र संताप व्यक्त केला जात असून महिला आयोगाने नोटीस बजावली आहे.   Print


News - Chandrapur | Posted : 2019-04-24


Related Photos