जिल्हाधिकारी , पोलीस अधिक्षणची लाहेरी गावाला भेट, जाणल्या समस्या


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / भामरागड
: तालुक्यातील  लाहेरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत २२ एप्रिल ते २४ एप्रिल पर्यंत कैवल्य एज्युकेशन फाऊंडेशन, पोलीस प्रशासन तथा भामरागड पंचायत समितीच्या  शिक्षण विभागातर्फे लाहेरी केंद्रातील  विद्यार्थ्यांसाठी बाल निवासी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्याला   जिल्हाधिकारी शेखर सिंग आणि जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
मेळाव्याचे तसेच विध्यार्थ्यांचे स्तुती केली . तसेच विर बाबुराव शेडमाके जात प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले एवढेच नव्हे तर प्राथमिक आरोग्य केंद्र पोलीस ठाणे, नव्याने सुरू झालेली बँक ऑफ महाराष्ट्रच्या  शाखेची पाहणी केली आणि खरीप हंगामासाठी जास्तीत जास्त कर्ज वाटप करण्यात यावे असे मार्गदर्शन केले. त्यानंतर गावातील आदिवासी नागरिकांसोबत विविध विषयावर चर्चा केली.  यावेळी गावातील लोकांनी रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याची मागणी केली.  तेव्हा जिल्हाधिकारी यांनी दहा ते पंधरा दिवसात नवीन रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.  
 यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक मोहित कुमार गर्ग, भामरागड चे तहसीलदार कैलास अंडील, गटशिक्षणाधिकारी अश्विनी सोनवणे, लाहेरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.  संभाजी भोकरे, शासकीय आश्रम शाळेचे मुख्याध्यापक ए डी ठमके, लाहेरी पोलिस मदत केंद्राचे पोलीस उपनिरीक्षक राजू सोनपितरे, अविनाश नडेगावकर, सरपंच पिंडा बोगामी, माजी सरपंच सुरेश सिडाम, लक्ष्मीकांत बोगामी, आधी गावकरी उपस्थित होते.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-04-24


Related Photos