महत्वाच्या बातम्या

 भामरागड येथे स्वेच्छा रक्तदान शिबिराचे आयोजन


- सांजमाडी या संस्थेचा नियमीत उपक्रम 

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / भामरागड : सांज मल्टी अॅक्टीव्हीटी डेव्हलपमेन्ट इन्स्टीट्यूट यस्टर एरीया बिनागुंडा स्थीत भामरागड या स्वयमसेवी सामाजीक संस्थेद्वारा १ ऑगस्ट २०२३ ला सकाळी ११:०० ते  ४:०० वाजेपर्यंत ग्रामीण रुग्णालय भामरागड येथे स्वेच्छा रक्तदान शिबीर चे आयोजन करण्यात आले. 

सदर शिबिरात पवन बाकडा, मुन्ना दुर्वा, राजू काळगा, जयदेव मडावी, लखन गुडीया, अशोक ओलाम, अलबीस एक्का, डॉ. समोष डाखरे, डॉ. प्रदीप मल्लीक, डॉ. मोनीका यादव, जगदीश दुर्गे, जोसेप मंडल, राकेश महाका, शैलेन्द्र गावडे, संजय खंडारकर, कमलाकर येलेवार, मृत्युजय सरकार, संतोष मैकवार, दिलीपकुमार राव, जोतीमय सरकार, प्रवीर मंडल, प्रेम कन्नाके, सुशिल बारई, संजय, रितेश सरकार, आजय वड्डे, प्रशांत उराडे, अमीत संस्कार या ३० पुरुष महीला रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान केले. डॉ. दिपक कानकडे ग्रामीन रुग्णालय भामरागड यांच्या हस्ते रक्तदान प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. 

उपजील्हा रुग्णालय अहेरी रक्तपेढी वैदयकीय चमू डॉ. अस्मीता देवगडे, निखील कोडापर्नी, शरद बांबोळे, कांचन कुमरे या वैधकीय चमूनी ३० रक्तपिशवी संकलन करून सत्तपेढी अहेरी येथे जमा करण्यात आले.

सांज मल्टी अॅक्टीव्हीटी या संस्थेद्वारा दर चार महिन्यांनी रक्तदान शिबीराचे नियम आयोजन करून गरजू रुग्णांना रक्तपुरवीले जात आहे. संस्थेच्या कार्याची सर्व स्तरावरून प्रशंशा होत आहे.

रक्तदान शिबीराच्या यशस्वीकरिता बंडू वाचामी, वैभव मेश्राम, राकेश महाका ग्रामीण रुग्णालय भामरागड येथील कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. संस्थेचे अध्यक्ष तथा संचालक कुमार रूपलाल मारोती गोंगले यांनी संस्थेचे आभार मानले.





  Print






News - Gadchiroli




Related Photos