काँग्रेस नेत्यांनी केलेल्या वक्तव्याचा केला निषेध , अ‍ॅट्रासिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर
: राजुरा येथील विद्यार्थिनी अत्याचारप्रकरणी काँग्रेस नेत्यांनी केलेल्या वक्तव्याविरूद्ध भाजपने मंगळवारी गांधी चौकात निदर्शने करून अ‍ॅट्रासिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
पीडित विद्यार्थिनींच्या अत्याचाराचा निषेध करण्याऐवजी समर्थन करून काँग्रेस नेत्यांनी हीन पातळी गाठल्याचा आरोप भाजप नेत्यांनी केला. अल्पवयीन विद्यार्थिनीवरील अत्याचारप्रकरणी पालक केवळ मदतीच्या लालसेने सरसावले असे म्हणणे म्हणजे काँग्रेस नेत्यांच्या विकृत मानसिकतेचे निदर्शक असल्याची टीका भाजपने केली.
गांधी चौकात भाजपने निदर्शने करून काँग्रेसचे माजी आमदार सुभाष धोटे, आमदार विजय वडेट्टीवार, बाळू धानोरकर यांचा निषेध केला. यावेळी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी निषेधाचे फलक फडकावत काँग्रेस नेत्यांविरूद्ध जोरदार नारेबाजी केली. यावेळी जि.प. अध्यक्ष देवराव भोंगळे, आमदार नाना श्यामकुळे, भाजप जिल्हाध्यक्ष हरिश शर्मा, आमदार संजय धोटे, महापौर अंजली घोटेकर, उपमहापौर अनिल फुलझेले, मनपा स्थायी समिती सभापती राहुल पावडे, संदीप आवारी, पोंभुर्णा पं.स.सभापती अल्का आत्राम, भाजपा आदिवासी आघाडीचे नेते वाघुजी गेडाम, शिला चव्हाण, अनुराधा हजारे आदींसह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.   Print


News - Chandrapur | Posted : 2019-04-24


Related Photos